आई थोर तुझे उपकार! दिव्यांग मुलानं जन्मदात्रीच्या उपचारासाठी प्रवचनातून जमवले पैसे

Ashok Chobhe from Ahmednagar has raised money for his mother's treatment through pravarchan
Ashok Chobhe from Ahmednagar has raised money for his mother's treatment through pravarchan
Updated on

अहमदनगर : दिव्यांग असलेले नवनाथ अशोक चोभे यांनी प्रवचने करून आपल्या आईच्या उपचारासाठी पैसे जमविले. आई-वडिलांचा सांभाळ करण्याचा संदेश ते प्रवचनांच्या माध्यमातून देत आहेत.
 
नगर तालुक्‍यातील बाबुर्डी बेंद येथील रहिवासी असलेले चोभे यांच्या आयुष्यात अनेक संकटे आली. लहानपणी चालताना त्रास होत होता. या व्यंगावर जिद्दीच्या जोरावर मात केली. आई छबूबाई यांना 2011 मध्ये कर्करोगाचे निदान झाले. वडिलांचे 2012 मध्ये अपघाती निधन झाले होते. एकामागोमाग एक संकटे कोसळली; मात्र चोभे यांनी हार मानली नाही. आईच्या उपचारासाठी पैसे जमविण्याचा निर्धार केला. 

चांदे (ता. नेवासे) येथील रोहिदास महाराज यांच्या संपर्कात आल्यावर अध्यात्माची आवड निर्माण झाली. प्रवचनाची कला आत्मसात केली. गावोगावी दिलेली प्रवचने व धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून मिळणाऱ्या मानधनातून आईवर उपचार सुरू केले. श्रीगोंदे तालुक्‍यातील कोरेगाव-चिखली येथील सामाजिक कार्यकर्ते पंढरीनाथ साबळे व मित्रपरिवाराची त्यांना मोलाची साथ मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com