
श्रीगोंदे : तालुक्यातील घोटवी येथील ४४ भाविकांना घेऊन अष्टविनायक दर्शनाला निघालेली बस श्रीगोंदेजवळील मखरेवाडी परिसरात उलटली. यात दहा ते बारा भाविक जखमी झाले आहेत, जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवारी(ता. १२) पहाटे पाचच्या सुमारास घडली.