
कोपरगाव :अधिकाऱ्यांनी लोकांना कामासाठी हेलपाटे मारायला लावू नयेत. लोकांची कामे वेळेवर झाली, तर जनता दरबार आयोजित करण्याची गरजच रहाणार नाही. आज येथे येणाऱ्या प्रत्येक अर्ज आणि निवेदनातील काम मार्गी लागले की नाही याची शहानिशा मी स्वतः करणार आहे. अधिकाऱ्यांना जनतेची कामे करता येत नसतील, तर नोकरीचा राजीनामा द्यावा, अशी तंबी आमदार आशुतोष काळे यांनी पंचायत समितीत आयोजित केलेल्या जनता दरबारात कामचुकार अधिकाऱ्यांना दिली.