
कोपरगाव : शहरात धाडसी चोरीच्या घटना घडू लागल्या ही चिंतेची बाब आहे. पोलिस प्रशासनाचे हे अपयश असून गुन्हेगारांवर वचक राहिला नसल्याचे दिसून येत आहे. पोलिसांचा धाक निर्माण करून कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवत गुन्हेगारांमध्ये वचक राहील, अशी परिस्थिती निर्माण करा, अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी प्रशासनाला दिल्या.