esakal | यशस्विनी महिला बिग्रेडच्या अध्यक्षा रेखा जरे पाटील यांची हत्या
sakal

बोलून बातमी शोधा

Assassination of Rekha Jare Patil President of Yashaswini Mahila Brigade

यशस्विनी महिला बिग्रेडच्या संस्थापक अध्यक्षा रेखा भाऊसाहेब जरे पाटील (वय ३९) यांच्यावर आज रात्री नगर- पुणे रस्त्यावर जातेगाव घाटात दुचाकीवर आलेल्या दोघांनी खुनी हल्ला केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

यशस्विनी महिला बिग्रेडच्या अध्यक्षा रेखा जरे पाटील यांची हत्या

sakal_logo
By
सुर्यकांत वरकड

अहमदनगर : यशस्विनी महिला बिग्रेडच्या संस्थापक अध्यक्षा रेखा भाऊसाहेब जरे पाटील (वय ३९) यांच्यावर आज रात्री नगर- पुणे रस्त्यावर जातेगाव घाटात दुचाकीवर आलेल्या दोघांनी खुनी हल्ला केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. 

अधिक माहिती अशी : रेखा जरे पाटील, त्यांची आई, मुलगा व महिला बालविकास अधिकारी विजयमाला माने, असे सर्व जण मोटारीने पुण्याहून नगरकडे येत होते. शिरूरच्या पुढे निघाल्यावर मागून आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्या मोटारीला कट मारला. नंतर मोटारीला ओव्हरटेक करीत पुढे जाऊन दुचाकी आडवी लावली. मोटार थांबल्यानंतर त्यांनी जरे पाटील यांच्याशी वाद घालण्यास सुरवात केली. बाचाबाची सुरू असतानाच, एकाने त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केला. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. 

विजयमाला माने यांनी स्वत: मोटार चालवित सुपे येथे आणले. तेथून जरे यांना रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. 

आमदार संग्राम जगताप यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. पोलिस उपअधीक्षक विशाल ढुमे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके, हारून मुलाणी यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देऊन घटनेचा तपास सुरू केला.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image