महापालिका कम्युनिटी किचनला अमेरिकेतून मदत 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 29 May 2020

अहमदनगर महापालिकेतर्फे गरजू गरीब आणि परप्रांतीय मजुरांचा अन्नाचा प्रश्न सुटावा यासाठी कम्युनिटी किचन सुरू करण्यात आले आहे. गेली दोन महिन्यांपासून महापालिका शहरातील गोरगरिबांना मदत करत आहे.

नगर - अहमदनगर महापालिकेतर्फे गरजू गरीब आणि परप्रांतीय मजुरांचा अन्नाचा प्रश्न सुटावा यासाठी कम्युनिटी किचन सुरू करण्यात आले आहे. गेली दोन महिन्यांपासून महापालिका शहरातील गोरगरिबांना मदत करत आहे. हे महापालिकेचे कार्य कळाल्यावर मूळच्या नगरमधील मात्र आता अमेरिकेत स्थायिक असलेल्या एका महिलेने महापालिकेच्या कम्युनिटी किचनला मदत पाठविली आहे. या मदतीची नगरमध्ये सध्या जोरदार चर्चा आहे. 

महापालिकेच्या कम्युनिटी किचनला अमेरिकेत स्थायिक असलेल्या झेप फाउंडेशनच्या सहसंस्थापक रेश्‍मा सांबरे यांच्यातर्फे हेमा तवले व केतन गुंदेचा यांच्या माध्यमातून 300 किलो गहू पीठ, 150 किलो तांदूळ, दोन तेलाचे डबे आणि 50 किलो भाजी ही मदत थेट अमेरिकेतून मदत मिळाली अशी माहिती महापालिका उद्यान विभाग प्रमुख आणि व्हिजिलन्स स्क्वाडचे अधिकारी शशिकांत नजान यांनी दिली. 

साहित्य महापालिकेतर्फे गणेश लायचेट्टी, आरोग्य अधिकारी नरसिंग पैठणकर यांनी स्वीकारले. यावेळी ऍड. तेजस्वी तवले तसेच, सूर्यभान देवघडे, विजय बोधे, स्वच्छता निरीक्षक राजेंद्र सामल, तुकाराम भांगरे तसेच अंकुर नवगिरे, मुकेश सोनवणे, मच्छिंद्र चिलवर, महेंद्र चौधरी उपस्थित होते. 

झेप फाउंडेशनच्या नगर मधील कार्यकर्त्या लीला कुलकर्णी, करिश्‍मा शेख, केतन गुंदेचा यांनीही या कामात स्थानिक पातळीवर महत्वाची मदत केली. झेप फाउंडेशन या संस्थेची नोंदणी अहमदनगर येथेच झालेली असून संस्थेचे कार्य प्रामुख्याने ग्रामीण आणि दुर्गम, अविकसीत भागातील स्त्रिया, अल्पसंख्यांक आणि लहान मुले यांच्या विकासासाठी रोजगार मिळवून देणारे शिक्षण आणि आर्थिक उन्नती यासंदर्भात चालू आहे. 

अमेरिकेत स्थायीक झालेल्या रेश्‍मा सांबरे यांनी जन्मभूमीसाठी ही काही समाजकार्य करण्याच्या हेतूने 2019 मध्ये माधुरी देशपांडे यांच्या समवेत झेप फाउंडेशनची स्थापना केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Assistance from the US to the Municipal Community Kitchen