esakal | कोविड काळातही लाचखोरी,सहायक निबंधकास पकडलं
sakal

बोलून बातमी शोधा

Assistant Registrar caught taking bribe

कोविडच्या काळातही लाचखोरी, सहाय्यक निबंधकास पकडलं

sakal_logo
By
अशोक निंबाळकर

नगर : येथील सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक सुदाम लक्ष्मण रोकडे (वय ः51, रा. कायनेटिक चौक , पुणे रस्ता , अहमदनगर) यांना 50 हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधकच्या पथकाने अटक केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

या बाबत माहिती अशी की, तक्रारदार यांनी एका पतसंस्थेकडून 2014 मध्ये सोने तारण ठेऊन 30 लाखाचे कर्ज घेतले होते. संबधित प्रकरणात पतसंस्थेने तक्रारदार यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

तक्रारदार यांनी न्यायालयाचे आदेशानुसार पतसंस्थेचे कर्जाची सर्व रक्कम भरली असतानाही पतसंस्थेने तक्रारदार यांच्या विरुद्ध सहकारी पतसंस्था फेडरेशन अहमदनगर यांच्याकडे कलम 101 नुसार तक्रारदार यांच्याकडुन वसुलीची कारवाई करण्याचे आदेश मिळण्याकरिता प्रकरण दाखल केले होते.

या प्रकरणात रोकडे यांनी तक्रारदार यांचे बाजुने निकाल दिला होता. तक्रारदार यांचे बाजुने निकाल दिला. त्यापोटी रोकडे यांनी तक्रारदार यांच्याकडे एक लाखाची मागणी केली. त्पयात तडजोड होऊन 50 हजारावर तडजोड झाली.

ही रक्कम पंचासमक्ष घेताना रोकडे यांना कायनेटिक चौक येथील होटेल जस्ट ईन अव्हेन्यूमध्ये रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.