esakal | रेडलाईट एरियातील बाधित महिलांमुळे शेवगावकरांत भीतीचे वातावरण
sakal

बोलून बातमी शोधा

An atmosphere of fear in Shevgaon

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने हा परिसर काही दिवस बंद ठेवावा. संबंधित महिलांना मोफत अन्नधान्याचा पुरवठा करावा किंवा रोजीरोटीसाठी इतर व्यवसाय करण्यासाठी मदत करावी, अशी मागणी होत आहे.

 

रेडलाईट एरियातील बाधित महिलांमुळे शेवगावकरांत भीतीचे वातावरण

sakal_logo
By
सचिन सातपुते

शेवगाव : शहरातील देहविक्री करणाऱ्या महिलांना कोरोनाची बाधा झाल्याने तेथे येणाऱ्या ग्राहकांच्या संख्येमुळे कोरोनाचा संसर्ग वाढू नये, म्हणून तो भाग तात्पुरता बंद ठेवावा, अशी मागणी शहर परिसरातून वाढत आहे. 

शेवगाव शहरातील एका भागात देहविक्रीचा व्यवसाय चालतो. त्यासाठी परराज्यातून व राज्याच्या इतर भागातून महिलांची सतत ये-जा असते. तसेच, परिसरातील औरंगाबाद, बीड, जालना, नगर या भागातून ग्राहकही येत असतात.

अनलॉकनंतर हा व्यवसाय पुन्हा जोमात सुरू झाला. दिवसभर येथे ग्राहकांची वर्दळ असते. रेडलाईट एरियातील त्या महिलाही दैनंदिन वस्तूची खरेदी करण्यासाठी शहरात फिरत असतात. त्यामुळे संसर्गाचा धोका वाढू शकतो. त्यात नगरपरिषद व आरोग्य विभागातर्फे "माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेअंतर्गत करण्यात आलेल्या चाचणीमध्ये येथील चार महिला काही दिवसांपूर्वी पॉंझिटीव्ह आढळून आल्या होत्या. त्यांच्यावर उपचार करण्यात आले असले तरी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने हा परिसर काही दिवस बंद ठेवावा. संबंधित महिलांना मोफत अन्नधान्याचा पुरवठा करावा किंवा रोजीरोटीसाठी इतर व्यवसाय करण्यासाठी मदत करावी, अशी मागणी होत आहे.


त्या भागातील चार महिला काही दिवसांपूर्वी कोरोना बाधित आढळल्या होत्या. त्यांच्यावर उपचारही करण्यात आले. त्या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून आवश्‍यक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.

- डॉ. सलमा हिराणी, तालुका आरोग्य अधिकारी, शेवगाव 


त्या परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्यात येईल आणि नागरिकांना मास्क सॅनिटायझर वापरण्याचे आवाहनही करण्यात येईल. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येतील. 
- रामराव ढिकले, पोलिस निरीक्षक शेवगाव 

संपादन - अशोक निंबाळकर