
घटनास्थळी जमलेल्या लोकांनी पोलिसांच्या सुचनेनुसार अर्धवट जळालेला मृतदेह विझवला. ठसेतज्ज्ञ व फॉरेन्सिक लॅबच्या पथकांना पाचारण करण्यात आले. पोलिस निरीक्षक समाधान पाटील यांनी जागीच पंचनामा केला.
शिर्डी (अहमदनगर) : राजुरी (ता. राहाता) शिवारातील निर्जन शेतात भल्या सकाळीच तरुणीचा मृतदेह जळत असल्याचे पाहून वाटसरू दचकले. पोलिस पाटलांना खबर मिळाली. त्यांनी लगेच लोणी पोलिसांना कळविले. पोलिस येईपर्यंत मृतदेह जळतच होता. घटनास्थळी जमलेल्या लोकांनी पोलिसांच्या सुचनेनुसार अर्धवट जळालेला मृतदेह विझवला. ठसेतज्ज्ञ व फॉरेन्सिक लॅबच्या पथकांना पाचारण करण्यात आले. पोलिस निरीक्षक समाधान पाटील यांनी जागीच पंचनामा केला.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पोलिस उपअधीक्षक संजय सातव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही अज्ञात तरुणी 20-25 वर्षांची असावी. ज्वालाग्रही द्रव टाकून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न झाला. अर्धवट जळालेला मृतदेह सकाळी आठच्या सुमारास प्रवरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. उत्तरिय तपासणी, फॉरेन्सिक लॅब व ठसेतज्ज्ञांचे अहवाल आल्यानंतर बऱ्याच बाबी स्पष्ट होतील. अद्याप या तरुणीची ओळख पटलेली नाही. राजुरी शिवारात निळवंडे कालव्याच्या शेजारी असलेल्या निर्जन शेतात ही घटना घडली. पोलिस पाटील रावसाहेब गोरे यांनी या घटनेची खबर पोलिसांना दिली.