चांडगाव येथील ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांची यात्रा मंगळवारपासून सुरू होत आहे. यात्रेनिमित्त राजेंद्र हिरामण लोंढे हे घराची स्वछता करीत असताना लोखंडी ग्रीलमध्ये उतरलेल्या विजेच्या प्रवाहाचा धक्का लागला.
Grief-stricken villagers gather at the site where a mother and son tragically died from electric shock.Sakal
श्रीगोंदे : घराची साफसफाई करताना विजेचा धक्का लागून मायलेकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता.२२) सकाळी आठच्या सुमारास तालुक्यातील चांडगाव येथे घडली. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.