Ahmednagar | विकृतीचा कळस! वृद्ध महिलेवर बलात्काराचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rape case

अहमदनगर | विकृतीचा कळस! वृद्ध महिलेवर बलात्काराचा प्रयत्न

अहमदनगर : तारकपूर भागात झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या वृद्ध महिलेवर बलात्काराचा प्रयत्न झाला आहे. या महिलेने आरडाओरड केला असता आरोपीने महिलेच्या तोंडावर काचेची बाटली मारली. या महिलेवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरी भागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, तोफखाना पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी आदींनी घटनास्थळी भेट दिली आहे. या प्रकरणी संशयावरून एका व्यक्तीस चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

loading image
go to top