लोकसहभागातून ऊभारलेल्या वनऔषधी प्रकल्पास आग लावऊन नष्ट करण्याचा प्रयत्न

मार्तंड बुचुडे
Friday, 27 November 2020

वडगाव गुंड येथील सुप्लाई देवी असलेल्या सुपात्या डोंगरावर लोकसहभागातून उभारलेल्या वनऔषधी प्रकल्पास काही समाजकंटकांनी आग लावण्याचा प्रयत्न केला.

पारनेर (अहमदनगर) : वडगाव गुंड येथील सुप्लाई देवी असलेल्या सुपात्या डोंगरावर लोकसहभागातून उभारलेल्या वनऔषधी प्रकल्पास काही समाजकंटकांनी आग लावण्याचा प्रयत्न केला. मात्र ही घटना सामाजिक कार्यकर्त्यांना समजताच त्यानी ही आग वेळीच अटोक्यात आनली. त्यामुळे या डोंगरावरील सुमारे दोन हजारवर वनऔषधी झाडे आगीपासून वाचली. 

यावर्षीच्या पावसाळ्यात वडगाव येथील भैरवनाथ मंदीर ग्रामविकास ट्रस्ट , वडगाव ग्रामविकास प्रतिष्ठाण व लोकजागृती सामाजिक संस्था यांच्या मार्फत सुमारे एकहजार सातशे विविध जातीच्या झाडांची लागवड केली आहे.

सुपात्या डोंगरावर सुमारे 24 एकर सरकारी जमिन आहे. या सरकारी जमिनीवर भैरवनाथ मंदीर ग्रामविकास ट्रस्ट, वडगाव ग्रामविकास प्रतिष्ठाण व लोकजागृती सामाजिक संस्था यांच्या मार्फत सुमारे चारशे विविध जातींच्या औषधी वनस्पती तर इतर काही दुर्मीळ जातीचे वृक्षलागवड केली आहे. या ठिकाणी सुमारे दीड हाजारावर झाडांना संरक्षक जाळी सुद्धा बसविली आहे. या झाडांना पाणी नियमित मिळावे यासाठी व झाडांचे संवर्धन व्हावे यासाठी झाडांना ठिबक सिंचन करण्यात आले आहे. त्या साठी कुकडी कालव्याजवळील विहीरीवरून विद्यूत पंप बसवून सुमारे 10 हजार लिटरक्षमतेचे शेततळे सुद्धा तयार केले आहे.

या डोंगरावर अनेक तरूण सकाळ संध्याकाळ फिरण्यास व्यायामास येतात त्यामुळे तरूणांसाठी येथे सुमारे दोन किलोमिटरचा धावण्याचा ट्रॅक तयार केला आहे.या सर्व कामासाठी सुमारे आठरा लाख रूपयांहून अधिक खर्च केवळ लोकसहभागातून केला आहे. तसेच सुपाईमाता या देवस्थानाच्या मंदिराचे कामही भाविकांनी सुरू केले आहे. ही सर्व काने लोकसहभागातूनच सुरू आहेत.

या प्रकल्पाच्या ऊभारणीस सुरूवात केली त्या वेळी काही लोकांनी विरोधही केला होता. या बाबत गेल्या महिण्यात वनविभाग, पोलिस, व तहसीलदार यांच्याकेडे तक्रारही केली होती मात्र त्याची दखल न घेतल्याने आज या समाजकंटकांनी या वनऔषधी प्रकल्पास आग लावण्याची प्रयत्न केला असावा असा ग्रामस्थांचा आरोप आहे. येथील जमीन सरकारी असल्याने या जमिनीवर काही समाजकंटकांचा डोळा आहे असाही संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

आम्ही लोकसहभागातून सुमारे दोन हजारवर वनऔषधी झाडांची लागवड केली आहे. येथे देवीचे मंदीर असून हा परीसर अतीशय प्रेक्षणिय आहे. मात्र काही लोकांना हे पहावत नसल्याने कोणी तरी वाईट हेतूने आग लावली असावी आम्ही लोकसहभागातून झाडे लावणे शेतळे खोदणे व ठिबक करणे यासाठी सुमारे 18 लाखाहून अधिक खर्च केला आहे.
- शंकर गुंड,अध्यक्ष, भैरवनाथ मंदीर ट्रस्ट, वडगाव गुंड 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attempts to set fire to a medicinal plant raised through public participation