जलसंधारणमंत्र्यांना लालबुंद डाळिंबांचा वानवळा!

shankarrao gadakh
shankarrao gadakhesakal

सोनई (जि.अहमदनगर) : जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख (shankarrao gadakh) कार्यक्रमानिमित्त रस्त्याने जात असताना शिंगवे तुकाई (ता. नेवासे) येथील पाच एकर लालबुंद डाळिंबाच्या बागेने त्यांना जणू हाक दिली. सर्व लवाजमा थेट शेताच्या बांधावर गेला. गाठीभेटी व इतर कार्यक्रमानिमित्त आज शनिवारी गडाख शिंगवे तुकाई भागात होते. कमी पाणी असतानाही प्रयोगशील शेतकरी बापूसाहेब पवार यांनी अतिशय कष्टातून पाच एकर डाळिंबाचे पीक बहरून दाखविले आहे. बागेत आलेल्या जलसंधारणमंत्री गडाखांचे वरद व संभाजी पवार यांनी स्वागत केले.

shankarrao gadakh
उसाच्या शेतात लपविला 721 किलो गांजा; दोन महिलांना अटक

यावेळी माजी सरपंच योगेश होंडे, गंगाधर विधाटे, शिवाजी पुंड, श्रीकांत पवार व परिसरातील शेतकरी उपस्थित होते. गडाख यांनी डाळिंब पिकाची जात, फळे धरण्याचा हंगाम, दिल्या जाणाऱ्या फवारण्या, वेळोवेळी केली जाणारी झाडांची छाटणी, पाणी व्यवस्थापन, तण नियंत्रण आदी विषयी शेतकरी पवार यांच्याशी चर्चा केली. इतर शेतकऱ्यांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या. पवार परिवाराने लालबुंद डाळिंबाचा दिलेला वानवळा गडाखांनी आनंदाने स्वीकारला.

shankarrao gadakh
Ahmednagar : अल्पवयीन मुलीला पळविल्याप्रकरणी आरोपीला पोलीस कोठडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com