
-विनायक दरंदले
सोनई : सोनई येथे शिंपी व्यवसाय करून उपजीविका करीत असलेल्या एका कष्टकरी कुटुंबाच्या मुलाने सोनईतील मुळा पब्लिक स्कूलपासून सुरू केलेला शैक्षणिक प्रवास स्थापत्य अभियंता विषयात अनेक यशाचे शिखर गाठत ‘कष्टाला फळ’ देणारे ठरले आहे. आई-वडिलांच्या कष्टाचा दीप प्रज्ज्वलित ठेवून यशवंत ठरलेल्या जिद्दी युवकाचे नाव अतुल अशोक शिरसाठ असून, त्याची पुण्यातील निकमार विद्यापीठाकडून दुबई येथील पोलारीस इंटरनॅशनल इंडस्ट्रीज कंपनीत प्रकल्प व्यवस्थापक म्हणून निवड झाली.