
पारनेर : तालुक्यासह शहरात पारनेर पोलिसांकडून नायलॉन मांजा विक्रेत्यांविरोधात अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. राज्यभरात नायलॉन मांजाविक्री व वापराला पूर्णपणे बंदी आहे. मात्र, तालुक्यात त्याची विक्री होताना दिसत असल्याने त्याचा धोका पक्ष्यांसह दुचाकीस्वारांना होणार आहे. मात्र, याबाबत पारनेर तालुक्यातील प्रशासनास फारसे गांभीर्य दिसत नाही. यातून एखादी मोठी दुर्घटनाही होऊ शकते. त्यामुळे त्यावर निर्बंध आणून कडक तपासणी करून संबंधितांवर कारवाई करणे गरजेचे आहे.