औटींचे मोठे वक्तव्य, सध्या मी कोण कुठे जातो काय करतो हे पाहतोय

मार्तंड बुचुडे
Thursday, 8 October 2020

शिवसेनेच्या सभासदनोंदणी अभियानाचा प्रारंभ औटी यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे होते.

पारनेर ः सध्या माजी आमदार, विधान सभेतील माजी उपाध्यक्ष विजय औटी यांच्याविषयी तालुक्यात चर्चा आहे. काहीजण तर त्यांनी राजकारण सोडले की काय अशीही चर्चा रंगवित आहेत. स्वतः औटी यांनीच राजकारणाबाबत वक्तव्य केले आहे.

कोरोनामुळे स्वत:च्या व समाजाच्या हितासाठी शांत बसलो आहे. तालुक्‍यात फिरत नाही, याचा अर्थ राजकारण सोडून दिले, असा नाही. यापुढेही मी राजकारणात सक्रीयच राहणार आहे. कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.

राजकीय घडामोडींवर बारीक लक्ष असून, कोण काय करतो, कोठे जातो, याचा अभ्यास करीत आहे, असे प्रतिपादन विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यानी केले. 
शिवसेनेच्या सभासदनोंदणी अभियानाचा प्रारंभ औटी यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे होते.

जिल्हा परिषद कृषी व बांधकम समितीचे सभापती काशीनाथ दाते, रामदास भोसले, तालुकाप्रमुख विकास रोहकले, नगराध्यक्ष वर्षा नगरे, डॉ. श्रीकांत पठारे, नितीन शेळके, नीलेश खोडदे, विजय डोळ आदी उपस्थित होते. 

औटी म्हणाले, ""विधानसभा निवडणुकीत पराभूत झालो, म्हणजे पुन्हा राजकारणात येणार नाही, असा काहींचा गैरसमज झाला असेल. यापुढेही मी राजकारणात सक्रीयच राहणार आहे. ग्रामपंचायत, नगरपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका आम्हीच जिंकाणार आहोत. माझ्या कार्यालयात अनेक कार्यकर्ते रोज येतात. मनातील खंत व्यक्त करतात.'' 
जिल्हाप्रमुख गाडे म्हणाले, की तालुक्‍यात सभासदनोंदणीस चांगला प्रतिसाद मिळाला. यापुढेही तालुकाभर सभासदनोंदणी करणार आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Auti said I will remain active in politics