esakal | पारनेरच्या राजकारणात औटी नावाचं वादळ पुन्हा येईल
sakal

बोलून बातमी शोधा

Auti will be active again in Parner's politics

लोकशाहीत निकोप वातावरणात निवडणुका झाल्या पाहिजेत. गावपातळीवर पूर्वी घरातील ज्येष्ठ व्यक्ती सांगेल तेथे लोक मतदान करायचे; पण आता तशी स्थिती राहिली नाही.

पारनेरच्या राजकारणात औटी नावाचं वादळ पुन्हा येईल

sakal_logo
By
एकनाथ भालेकर

राळेगणसिद्धी : ""विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी हे एक मुरब्बी राजकारणी आहेत. ते कधीही शांत बसणार नाहीत. राजकीय मैदानात वादळ बनून पुन्हा ते यशस्वी होतील,'' असा आत्मविश्वास नारायणगव्हाणचे माजी सरपंच सुरेश बोरुडे यांनी व्यक्त केला. 

नारायगव्हाण येथे शुक्रवारी (ता. 13) एका कार्यक्रमानंतर ते बोलत होते. बोरुडे म्हणाले, ""औटी हे मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहेत. पारनेर तालुक्‍यातील तरुण मुले दिशाहीन झाली असून, त्यांना ते नक्कीच योग्य दिशा देतील.

औटींच्या नेतृत्वाखाली आगामी पारनेर नगरपंचायतीच्या निवडणुकीत सर्व जागा शिवसेना जिंकेल. तालुक्‍यात पुन्हा शिवसेनेची ताकद निश्‍चितच वाढेल. राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध होण्याचा प्रस्ताव तालुक्‍यातील गावपुढाऱ्यांसमोर मांडला असला, तरी ते शक्‍य होणार नाही.

लोकशाहीत निकोप वातावरणात निवडणुका झाल्या पाहिजेत. गावपातळीवर पूर्वी घरातील ज्येष्ठ व्यक्ती सांगेल तेथे लोक मतदान करायचे; पण आता तशी स्थिती राहिली नाही. सर्व मतदार आता सुशिक्षित व हुशार झाले आहेत. गावपातळीवरच्या निवडणुका नातीगोती, सोयरेधायरे, तसेच मित्रमंडळींवर अवलंबून असतात.'' 

संपादन - अशोक निंबाळकर

loading image
go to top