महिला शेतकऱ्यांनी कीटनाशक फवारणीवेळी ‘ही’ काळजी घेणे आवश्‍यक

शांताराम काळे
Sunday, 13 September 2020

मवेसी येथे अकोले तालुका कृषि विभाग व कोर्टेवा आग्रिसाइंस सामाजिक संस्था वतीने फक्त महिला शेतकाऱ्यांसाठी करोना व कीटकनाशकापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपकरणांची माहिती देवून जनजागृती केली.

अकोले (अहमदनगर) : तालुक्यातील मवेसी येथे अकोले तालुका कृषि विभाग व कोर्टेवा आग्रिसाइंस सामाजिक संस्था वतीने फक्त महिला शेतकाऱ्यांसाठी करोना व कीटकनाशकापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपकरणांची माहिती देवून जनजागृती केली. 

कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी बी. गीतारानी होत्या. आदिवासी महिला शेतात औषध फवारनी करतात. तेव्हा त्यांनी ‘सुरक्षित फवरनी उपायोजना’ या विषयावर मार्गदर्शन केले. नाक व तोंडासाठी मास्क, डोळ्यांसाठी चष्मा, हातासाठी हात मोजे, पूर्ण शरीरासाठी कोट आदीचा वापर केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. यावेळी याबाबतचे प्रात्यक्षिक दाखवाण्यात आले. याबरोबर फवारणी करताना तंबाखू खाने व धूम्रपान करणे टाळावे. 

पीक संरक्षक रसायनाची बाटली उगडल्यानंतर वास घेवू नये. फक्त परवाना धारक दुकानतूनच कीटाकनाशक खरेदी करावे. त्याची सेवा समाप्तिची तारीख तपासून घ्या. फवारणी झाल्यावर अंगावरील कपडे स्वच्छ पाण्याने धुणे आवश्यक असून अंघोळ करावी. 

यावेळी मंडल कृषी अधिकारी गिरीश बिबवे थानी गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनाची माहिती दिली. दुर्गम आदिवासी भागात बऱ्याच वेळा दुर्धवी उपाघातीची घटना घड़ते. पंरतु माहितीच्या आभावी त्याचा मदतीचा प्रस्ताव होत नाही.

आत्मा अंतर्गत महिलानी गटाद्वारे संघटीत झाल्यास प्रक्रिया व मूल्यवृद्धि प्रशिक्षण दिले जाईल, जेनेकरून गावताच रोजगार उपलब्ध होतील. याचीही माहिती देण्यात आली. त्याबरोबार आदिवासी महिलांचा आहारात नाचणी आसणे आवश्यक आहे. शेवटी गावातून कोविड व कीटकनाशके फवरणी जनजागृतीसाठी प्रचार फेरी काढ़ण्यात आली. घोषणानी येथील परिसर दुमदुमून गेला.

मंडळ कृषि अधिकारी गिरीश बिबवे, गणेश काकडे, कृषि सहायक यशवंत खोकले, राजाराम साबले, देवीदास कदम, साहेबराव वायळ, संतोष साबळे, आत्माचे बालनाथ सोनवने, सोशल वर्कर सुरेश नवले, बारव वाड़ी, माणिक ओझर, सरपंच कमल बांबळे, वर्षा कोंडार, हासाबाई कोंडर, सत्यभामा बोटे, हीराबाई पंडीत, अजय कोंडर, मारुती भांगरे व परिसरातील महिला उपस्थित होत्या. अकोले तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी परिश्रम घेतले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Awareness among women farmers at Mavesi in Akole taluka