
संगमनेर : निळवंडे कालव्यातून शेतकऱ्यांना पाणी देण्यासंदर्भात वादाचा विषय नाही. लाभक्षेत्रातील गावाला हक्काचे पाणी मिळाले पाहिजे, ही पाटबंधारे विभागाची जबाबदारी आहे. त्याबाबतीत वेळापत्रक तयार करणे, ते योग्यरित्या पाळणे, याचा विश्वास लोकांना देणे, ही भूमिका पाटबंधारे विभागाने घ्यायला हवी. हा विषय राहुरी किंवा राहात्याला जाणाऱ्या पाण्याच्या बाबतीत नाही, ज्याचा हक्क आहे, त्याला पाणी मिळालेच पाहिजे, यामध्ये पाटबंधारे विभागाचा संवाद कमी पडत आहे. शेतकऱ्यांना विश्वासात घ्या, चर्चेतून मार्ग निघेल, असे मत ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.