कितीही भविष्यवाण्या केल्या तरी आघाडीला धोका नाही - थोरात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

balasaheb thorat

भविष्यवाण्या झाल्या तरी आघाडीला धोका नाही - थोरात

sakal_logo
By
मुरलीधर कराळे

अहमदनगर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांच्या, मला माजी मंत्री म्हणू नका, तीन दिवस वाट पहा, या वक्तव्याबाबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) म्हणाले, की ते गेली दोन वर्षे अशीच मुदत देत आहेत, भविष्यवाणी करीत आहेत. मात्र, आघाडीला धोका नाही. भाजपमध्ये (BJP) सध्या नैराश्याचे वातावरण आहे. त्यांचे अनेक नेते, कार्यकर्ते महाविकास आघाडीमध्ये (mahavikas aghadi) येण्यास तयार आहेत. ते आल्यानंतर भविष्यात ते भावी सहकारी होऊ शकतात, असे वक्तव्य महसूलमंत्री थोरात यांनी माध्यमांशी बोलताना केले. पूरग्रस्तांना लवकरच नुकसान भरपाई मिळेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

‘ते’ आघाडीत आल्यास भावी सहकारी होतील

येथील शासकीय इमारतीच्या पाहणीसाठी थोरात (ता.17) नगरला आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याबाबत बोलताना ते म्हणाले, की मुख्यमंत्री काय म्हणाले, हे अगोदर त्यांना विचारले पाहिजे. महाविकास आघाडी सरकार पुढील तीन वर्षे पूर्ण करणार आहे. त्यामुळे भाजपमधील काही लोकांना ते पाहवत नसेल. भाजपमधील अनेक जण कॉँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीत येण्यास तयार आहेत. ते भाजप सोडून कोणत्याही पक्षात येऊ शकतात. त्यामुळे ते आमचे सहकारी होऊ शकतील. या वेळी आमदार लहू कानडे, अशोक भांगरे आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा: श्रीरामपूर : तृतीयपंथीयाकडून हत्या; 4 साथीदार गजाआड

केंद्राने हे पैसे वेळेत दिले पाहिजेत

दरम्यान, जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगावमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. याबाबत लवकरच कॅबिनेटमध्ये चर्चा केली जाईल. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळण्याबाबत निर्णय घेतला जाईल. महाराष्ट्रात राज्य चालवताना सरकारला मोठी कसरत करावी लागत आहे. आम्ही कर्ज काढतो, दुसरीकडे केंद्र सरकारकडे अडकलेला जीएसटीचा परतावा मिळत नाही. तब्बल ३० ते ४० हजार कोटी रुपयांची ही थकबाकी आहे. केंद्राने हे पैसे वेळेत दिले पाहिजेत.

हेही वाचा: 'या' लोहमार्गास मान्यता द्या; साईभक्तांची गैरसोय टळेल

loading image
go to top