संगमनेर : महायुतीने विधानसभा निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणीसाठी २१०० रुपये देण्याची घोषणा केली. त्यांना काही दिले नाही. कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांना फसवले. आमदारांच्या मारामाऱ्या सुरू आहेत..मंत्र्यांनी कसे वागावे हे सांगण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. अनेक मंत्री पैशांचे घोटाळे करत आहेत. मोठा भ्रष्टाचार झाला आहे. मुख्यमंत्री त्यांच्यावर पांघरूण घालत आहेत. अशी राज्याची दयनीय परिस्थिती असून महायुती ही सत्तेसाठी एकत्र असून, महायुती सरकारमुळे महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे सुरू असल्याची टीका काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारवर केली आहे..वादग्रस्त मंत्री, त्यांची वक्तव्य सरकारचा कारभार याबाबत माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना थोरात म्हणाले, मंत्र्यांनी कसे वागावे ही सांगण्याची वेळ येते. हे अत्यंत दुर्दैवी आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे चुकलेच आहे..अनेक मंत्री घोटाळे करत आहेत. भ्रष्टाचार करत आहेत. आमदारांचा गोळीबार, मारामारी, सत्ताधाऱ्यांची बेताल वक्तव्य सुरू असताना मुख्यमंत्री त्यांच्यावर पांघरूण घालत आहेत. सुप्रीम कोर्टाने तीन हजार कोटींचा घोटाळा निदर्शनास आणून दिला. की वर्क ऑर्डर रद्द करावी लागली, ते कुठेही दाखवले जात नाही. आमदारांचे भाऊ आता गोळीबार करू लागले आहेत..पुरोगामी विचारांचे प्रवीण गायकवाड यांच्यावर हात उचलला गेला आहे. बीडमध्ये मोठी भयानक अवस्था निर्माण झाली आहे. विधानभवनामध्ये गुंड शिरतायेत, हाणामाऱ्या करत आहेत आणि भाजप त्यांना संरक्षण देते आहे हे अत्यंत वाईट आहे. लोकशाही मार्गाने आंदोलनाचा अधिकार काढून घेण्यासाठी जन सुरक्षा विधेयक या सरकारने पास करून घेतले आहे, असे ते म्हणाले..Satara News: शासनाच्या दुर्लक्षामुळे हर्षल गेले; आणखी कुणी जीव देऊ नये यापूर्वी बिले द्या, कऱ्हाडात कंत्राटदारांची मागणी.शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी व लाडक्या बहिणीला २१०० रुपये देण्याची घोषणा केली होती. शेतकरी व महिलांना त्यांनी फसवले आहे. पैसे नाही, तर ५७ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या कशा मान्य केल्या, असा सवाल विचारताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी आमदारांना निधी देणार आहे, हा दुजाभाव होत आहे.- बाळासाहेब थोरात, माजी मंत्री.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.