
पठारभागातील बोटा गावांतर्गत असलेल्या माळवाडी येथील श्री स्वामी समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे गुरूवारी दुपारी दोन वाजता परिसरातील कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला.
बोटा : कोरोनाची लस येईपर्यंत जनतेने सावधनता बाळगणे गरजेचे आहे, असे आवाहन संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी केले.
पठारभागातील बोटा गावांतर्गत असलेल्या माळवाडी येथील श्री स्वामी समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे गुरूवारी दुपारी दोन वाजता परिसरातील कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हा परिषदेचे कॉंग्रेस गटनेते अजय फटांगरे, रमेश आहेर, शिवाजी पोखरकर, बोटाचे सरपंच विकास शेळके, पोलिस पाटील संजय जठार, गोरक्षनाथ नेहे, शिवाजी शेळके, बाळासाहेब कुऱ्हाडे उपस्थित होते. निकम म्हणाले, की कोरोना काळातील सर्व कोरोना योद्ध्यांचे कार्य कौतुकास्पद आहे.
आपल्या तालुक्याच्या बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होणे साहजिक आहे. मात्र, असे असताना प्रत्येक गावातील सरपंच, पोलिस पाटील, महसूल व आरोग्य आदी कर्मचाऱ्यांच्या जागरुकतेमुळे कोरोना काळातील मृत्यूंची संख्या आटोक्यात राहिली. अहमदनगर