
संगमनेर - जर बीडमध्ये दाऊदपेक्षाही मोठे गुंड असतील, तर तेथील कायदा-सुव्यवस्था कशी टिकेल? तर दुसरीकडे सरकार 'आका'ला पाठीशी घालत आहे. यामुळे गुंडांना राजकारणी पोसतात की राजकारण्यांना गुंड पोसतात हे खऱ्याअर्थाने महाराष्ट्राला कळेनासे झाले आहे, अशी टीका आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली.