Sangamner: आलिशान कारमधून गोमांसची वाहतूक; ५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, पाेलिसांना उडवाउडवीची उत्तरे..
संगमनेरकडून पुणेच्या दिशेने जाणारी इकोस्पोर्ट कार येताना दिसली. त्यामध्ये पुढील बाजूस दोघे बसलेले दिसून आले असता खात्री होताच कार रस्त्याच्या कडेला घेण्याचा इशारा केला. चालकाने कार रस्त्याच्या कडेला घेतली.
संगमनेर : तालुक्यातील घारगावजवळ सोमवारी (ता.२८) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास गोमांसची वाहतूक करणारी आलिशान कार पोलिसांनी पकडून ५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात केला आहे.