esakal | उद्योजक हिरण हत्येच्या निषेधार्थ अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय; तिसऱ्या दिवशीही बेलापूर बंद

बोलून बातमी शोधा

Belapur was closed for a third day to protest the killing of Gautam Hiran trader in Belapur }

रविवारी दुपारी हिरण यांचा मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठविला. सोमवारी दुपारी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

उद्योजक हिरण हत्येच्या निषेधार्थ अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय; तिसऱ्या दिवशीही बेलापूर बंद
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

श्रीरामपूर (अहमदनगर) : तालुक्यातील बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांचे अपहरण आणि हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ शनिवार (ता. ६) पासून सुरु असलेला बेलापुर बंद आज तिसऱ्या दिवशीही पाळण्यात आला. हिरण यांच्या हत्येप्रकरणी पोलीसांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने हिरण कुटूंबीय, ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेवून अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय घेतला आहे.

सोमवारी (ता. १) सायंकाळी बेलापूर-राहुरी बाह्यवळण रस्त्यावरुन व्यापारी हिरण यांचे अपहरण झाले होते. सदर घटनेचा निषेध करुन शनिवारी (ता. ६) बेलापूरात बंद पाळण्यात आला. त्यानंतर रविवारी (ता. ७) सातव्या दिवशी येथील एमआयडीसी परिसरात वाकडी शिवारात हिरण यांचा मृतदह रस्त्याच्या कडेला आढळून आला. त्याचे तीव्र पडसाद बेलापूरात उमटले. व्यापारी व ग्रामस्थांनी पुन्हा गाव बंद ठेवले. पोलिसांनी मारेकऱ्यांचा तपास लावून तत्काळ अटक न केल्यास मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याची भुमिका घेतली. रविवारी दुपारी हिरण यांचा मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठविला. सोमवारी दुपारी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

हिरण यांच्या हत्या प्रकरणातील संबंधित आरोपींना जोपर्यंत अटक होत नाही. तो पर्यंत अंत्यसंस्कार न करण्याची भुमिका हिरण कुटूंबियासह ग्रामस्थांनी आजही कायम ठेवली. सदर घटनेच्या निषेधार्थ बेलापूरात कडकडीत बंद पाळण्यात आला. हिरण यांच्या हत्येप्रकरणी पोलीसांकडून अपेक्षित माहिती मिळत नसल्याने कुटूंबिय व ग्रामस्थांनी हिरण यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका कायम ठेवल्याची माहिती भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते सुनिल मुथ्था यांनी दिली आहे.

दरम्यान, व्यापारी हिरण यांच्या हत्येप्रकरणाचा तपास सुरु असताना पोलीसांना काही महत्वाचे धागेदोरे मिळाले असून पुढील दोन दिवसांत आरोपी सापडण्याची शक्यता पोलीस सूत्रांकडून समजते. बेलापूरासह येथील रासकर नगर परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवला असून गेल्या दोन दिवसांपासून पोलिस अधीक्षक मनोज पाटील येथे ठाण मांडून आहे.