
संगमनेर : जिल्ह्याला वरदान ठरलेली भंडारदरा व निळवंडे ही दोन्ही धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली असतानाही, लाभधारकांना प्रथमच शेतीच्या पाण्याला मुकावे लागले असून, धरण उशाला आणि कोरड घशाला, अशी अवस्था झाली आहे. अमृतवाहिनी प्रवरेच्या पाण्याने सुजलाम्- सुफलाम् झालेल्या उत्तर अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर व राहुरी तालुक्यातील प्रवरा उजव्या कालव्यावरील लाभधारक शेतकऱ्यांना, पाणीमागणी न नोंदविल्याने रब्बी हंगामातील आवर्तनाचे पाणी मिळाले नाही.
भंडारदरा धरणातून कालव्यांद्वारे वितरित होणाऱ्या कृषी सिंचनाच्या पाण्याची मागणी नोंदविण्याची आवश्यकता असते. यापूर्वी साखर कारखाना, तसेच उपसा जलसिंचन योजनेच्या पुढाकाराने कृषी सिंचनासाठी सात क्रमांकाचे अर्ज भरून घेतले जात होते. त्यातच, त्वरित पाणी मिळण्यासाठी पाइपचा वापर वाढल्याने, कालव्याच्या वितरिका नादुरूस्त झाल्यामुळे सिंचनव्यवस्था कोलमडली आहे. वितरिका व प्रवाही पद्धतीने वाहणाऱ्या पाण्यामुळे परिसरातील विहिरींच्या जलस्तरात होणारी वाढ थांबल्याचे निदर्शनास येत आहे.
अनेक शेतकऱ्यांना सिंचनाचे पाणी मिळण्याचे नियंत्रण जलसिंचन विभागाकडे असल्याचेही शेतकऱ्यांना माहिती नसल्याने, पाणी मिळण्यासाठी अर्ज भरले गेले नाहीत. यासाठी स्थानिक नेतृत्व, ग्रामपंचायत व शेतकरी मंडळांनी पुढाकार न घेतल्यास त्याचे दूरगामी परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागणार आहेत.
आवाहन करण्याची वेळ
अर्ज भरण्यासाठी सिंचन शाखेचे शाखा अभियंता, उपअभियंता, कालवा निरीक्षकांना लाभक्षेत्रातील गावोगावी फिरून आवाहन करण्याची वेळ आली आहे. थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी महावितरणने रोहित्रे बंद करण्याची मोहीम सुरू केली आहे. अशात कालव्याचे पाणी बंद, अशा विचित्र अवस्थेत शेतकरी सापडला आहे.
२८ फेब्रुवारीपर्यंत रब्बी हंगाम
सप्टेंबर 2021 मध्ये भंडारदरा ओव्हर-फ्लो होऊन एक महिन्यापर्यंत प्रवरा नदी व कालवे वाहत होते, तर निळवंडे धरणातून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन ऑक्टोबर, नोव्हेंबर 2021, तसेच 2 जानेवारी 2022 रोजी सुरू झाले होते. पुढील तीन दिवस उजवा कालवा प्रवाहित होता. 28 फेब्रुवारीपर्यंत रब्बी हंगाम असल्याची माहिती चणेगाव येथील प्रगतिशील शेतकरी विठ्ठलदास आसावा यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.