
अहमदनगर : शासनाने सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावर बंदी घातलेली आहे. असे असतानाही शहरात या प्लास्टिकचा सर्रास वापर सुरू आहे. त्यामुळे महानगरपालिकेने सिंगल यूज प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. तेलीखुंट व डाळमंडई परिसरात आज कारवाई करून ६० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे, तसेच संबंधितांकडून १५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. व्यावसायिकांसह नागरिकांनी देखील सिंगल यूज प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नये; अन्यथा दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे.