भंडारदरा धरणातून सोडले पाणी; ‘या’ गावांना सतर्कतेचा इशारा

शांताराम काळे
Sunday, 16 August 2020

भंडारदरा पाणलोट क्षेत्रात जोरदार प्रजनवृष्टी होत असून सकाळी सहा वाजता भंडारदरा जलाशय भरले.

अकोले (अहमदनगर) : भंडारदरा पाणलोट क्षेत्रात जोरदार प्रजनवृष्टी होत असून सकाळी सहा वाजता भंडारदरा जलाशय भरले. पाणी नियंत्रणासाठी व येणाऱ्या पाण्याची आवक पाहता स्पिलवे मधून २४३६ क्युसेकने पाणी प्रवरा नदीत झेपावले आहे.

विज केंद्र एकमधून ८३२ क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे, तर वाकी जलश्यातून २५४५ क्यूसेक्सने पाणी व्हात असल्याने प्रवरा नदीतून सुमारे ६५०० क्युसेकस वेगाने पाणी सुरू झाले आहे. हा विसर्ग दुपारी वाढविण्यात येईल, असे जलसंपदा विभागाने सांगितले. जलशयाखालील व नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

भंडारदरा पाणलोट क्षेत्रात १५ ऑगस्टला जलशयात १०००१ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. मात्र, रात्री जोरदार वृष्टी झाल्याने धरणातील आवक ८०१, दशलक्ष घनफूट आल्याने कार्यकारी अभियंता नानोंर यांनी सकाळी ६ वाजता जलाशय भरल्याचे जाहीर करून संडव्यातून पाण्याने गुळणी फेकून पाणी प्रवरा पात्रात झेपावले. यावेळी अधिकाऱ्यांनी जालशयात नारळ, साडी अर्पण करून जलाशयाची पूजा केली. काल झालेल्या पाऊस घाटघर २४५, रतनवाडी २४०, पांजरे २३०, भंडारदरा १७५ मिलीमीटर नोंद झाली. सर्वाधिक पाऊस घाटघर येथे १० इंच पडला.

एका बाजूला आनंद तर दुसरीकडे दुःखाची काळी किनार

भंडारदरा जालशय भरल्याचे लाभक्षेत्रातील आनंद द्विगुणित असला तरी पाणलोटात अधिक पाऊसमुळे अनेक संकट व अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पावसाळा आला की जनावरे अतिवृष्टीमुळे दगवतात. भातपिके सडतात, रस्ते खराब तर बांध बंदिस्त फुटतात. त्यामुळे आदिवासी माणसे चिंतित असतात. भांडारदरा, कोदनी वीजप्रकल्प सुरू झाले असून तालुक्यातील दहा लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhandardara dam in Akole taluka has been filled and water has been released Pravara river