Water release from Bhandardara and Nilwande dams to provide relief to villages facing water shortages in Ahilyanagar district.
esakal
अहिल्यानगर, : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर भंडारदरा धरणातून बिगर सिंचनाचे, तर निळवंडे धरणातून सिंचनाचे आवर्तन रविवारपासून (ता.१५) सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. पाण्याचा अपव्यय टाळून अतिशय संवेदनशीलपणे आवर्तनाचे नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.