
अकोले (नगर): उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असणाऱ्या भंडारदरा जलाशयात 4,798 दशलक्ष घनफुट इतका साठा असून 47.95 टक्के जलाशय भरले आहे. पाऊस उघडल्याने पाण्याची आवक मंदावली आहे. आज भंडारदरा जलाशयावर कडक ऊन पडले असून या जलाशयाच्या भिंतीवर मोठ्या प्रमाणात गवत वाढले असून दरवर्षी हे गवत व जलाशयाचे डागडुजी करणे इत्यादी कामे पाटबंधारे विभाग करत असते. या कामासाठी स्थानिक ठिकाणी असणारे कर्मचारी काम करतात. मात्र यावर्षी पाटबंधारे विभागाला विसर पडला की काय असे चित्र समोर आले आहे.
उत्तर नगर जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करणाऱ्या या जलाशयाची दुरावस्था पाहताना वृद्ध झालेल्या आई वडिलांना दुर्लक्ष्य करणारे मुले पाहताना संताप होतो. तोच प्रकार ज्या धरणाच्या पाण्याने हजारो संसार उभारले तोच जलाशय आज दुर्लक्षित होत असताना दिसत आहे. पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कर्मचारी आपल्या पालन कर्त्यालाच विसरले असे समजायचे का? कारण जलाशय आहे म्हणून. तुमचे पगार आहेत तर लाभक्षेत्रातील शेतकरी जीवनात सुवर्ण पहाट उगवली तर पुढाऱ्यांच्या राजकारणात भंडारदरा जलाशय हा महत्वाचा मुद्दा असताना पुढारी, अधिकारी कर्मचारी, यांनी पाठ फिरवली आहे.
आज भंडारदरा जलाशय शंभरी पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर असताना त्यांच्या अंग खांद्यावर गवत उगवले असून ते साफ करण्यासाठी सवड कुणालाच नाही. याबाबत भंडारदरा जलाशयावर भेटलेल्या एक वरिष्ठ कर्मचाऱ्याला विचारले तर साहेब काय करणार जलाशयाच्या देखभालीसाठी निधीच उपलब्ध नाही, काम कसे करायचे? वरिष्ठ कार्यालयाला पत्रव्यवहार व प्रस्ताव पाठविला आहे. त्यांचे कोरोनामुळे उत्तर मिळाले नाही.
मात्र ज्या भंडारदरा जलाशयाच्या देखभालीसाठी चार डझन मजूर उपलब्ध असताना जलाशयाच्या अंग खांद्यावर वाढलेले गवत काढायला काय अडचण तिथे कुठे आला निधीचा प्रश्न मात्र पळवाट काढण्यासाठी हुशारी दाखवत आपल्यावरील जबाबदारी झटकून टाकणारे कर्मचारी दिसले तर सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आलेले काही कर्मचारी झिंगलेल्या अवस्थेत पाहायला मिळाले. त्यामुळे धरणाच्या संरक्षणाची अवस्थाही आंधळे दळते नि कुत्रं पीठ खाते, अशी आहे. या जलाशयावर एक पोलीस कर्मचारी खुर्ची टाकून होता, मात्र इतर कर्मचारी दिसून आले नाही. बहुतेक राजूर पोलीस कर्मचारी अपूर्ण असल्याने कोरोना ड्युटी साठी गेले असावेत.
संपादक - सुस्मिता वडतिले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.