
श्रीरामपूर : ऑपरेशन सिंदूर चारच दिवसांत थांबवलं गेलं आणि त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘हे युद्ध आम्ही थांबवलं,’ असं सांगितलं. मग मोदी सरकार गप्प का? देशवासीयांना अजूनही उत्तर मिळालेलं नाही. ही सरकारच्या परराष्ट्र आणि संरक्षण नीतीच्या अपयशाची कहाणी आहे, अशी टीका भाकप (माले) लिबरेशनचे नेते दीपांकर भट्टाचार्य यांनी केली.