पारनेर दूध पतसंस्थेच्या अध्यक्षपदी भाऊसाहेब लामखडे

अनिल चौधरी
Sunday, 27 September 2020

लामखडे यांच्या अध्यक्षपदाची सुचना संचालक विठ्ठलराव कवाद यांनी मांडली संचालक प्रकाश वराळ यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्ष लोखंडे यांच्या नावाची सुचना संचालक मच्छिंद्र लाळगे यांनी मांडली संचालक दशरथ बोचरे यांनी अनुमोदन दिले.

निघोज : पारनेर तालुक्यातील अग्रगण्य असलेल्या भैरवनाथ दूध पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बाजार समितीचे माजी उपसभापती भाऊसाहेब लामखडे तसेच उपाध्यक्षपदी विष्णू लोखंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.संचालक मंडळाची बैठक पतसंस्थेच्या सभागृहात शुक्रवार दि. 25 रोजी झाली.

या वेळी या निवडी करण्यात आल्या. यावेळी संस्थेचे माजी चेअरमन व तालुक्याचे माजी उपसभापती नानासाहेब वरखडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. वरखडे यांच्या निधनाने अध्यक्षपद रिक्त होते. संस्थेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब लामखडे यांना अध्यक्ष करण्यात आले. तर ज्येष्ठ संचालक विष्णू लोखंडे यांना उपाध्यक्ष करण्यात आले.

लामखडे यांच्या अध्यक्षपदाची सुचना संचालक विठ्ठलराव कवाद यांनी मांडली संचालक प्रकाश वराळ यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्ष लोखंडे यांच्या नावाची सुचना संचालक मच्छिंद्र लाळगे यांनी मांडली संचालक दशरथ बोचरे यांनी अनुमोदन दिले.

या वेळी सर्व संचालक मंडळ तसेच संचालिका अरुणा उत्तम मोरे, संचालक गणेश टेमगिरे, बबन सोनवणे, जी एस महानगर बॅंकेचे सेवानिवृत्त अधिकारी बाळासाहेब ठुबे, निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे ज्येष्ठ संचालक अॅड बाळासाहेब लामखडे, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्थ व पतसंस्थेचे सल्लागार शिवाजी वराळ, जी एस महानगर बॅंकेचे सेवानिवृत्त अधिकारी गोविंदराव लाळगे, निघोज परिसर कृषी फलोद्यान सहकारी संस्थेचे ज्येष्ठ संचालक खंडू लामखडे, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्थ रमेश ढवळे, श्रीराम शिनारे, पतसंस्थेचे अॉडीटर कोळपकर, किसान युनियन पतसंस्थेचे व्यवस्थापक मगर, पतसंस्थेचे कार्यलक्षी संचालक सोमनाथ वरखडे पतसंस्थेचे वरिष्ठ अधिकारी रामराव वरखडे, वसुली अधिकारी बाबाजी वाघमारे आदी उपस्थित होते. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhausaheb Lamkhade as the President of Parner Dudh Patsanstha