esakal | भिस्तबाग परिसर झाला कंटेन्मेंट झोन 
sakal

बोलून बातमी शोधा

amc nagar

भिस्तबाग परिसरात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने महापालिका आयुक्‍त श्रीकांत मायकलवार यांनी हा परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर केला.

भिस्तबाग परिसर झाला कंटेन्मेंट झोन 

sakal_logo
By
अमित आवारी

नगर : भिस्तबाग परिसरात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने महापालिका आयुक्‍त श्रीकांत मायकलवार यांनी हा परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर केला. तत्पूर्वी त्यांनी या परिसराची पाहणी केली. त्यांच्या समवेत शहर अभियंता सुरेश इथापे होते. 

महापालिकेने भिस्तबाग, अयोध्यानगर, कौशल घर, सुपर क्‍लिनर्स, उत्तरेकडील ओढा, शेंदुरकर घर, पिंपरकर घर, मचे घर ते कौशल हा परिसर पत्रे लावून सील केला. या परिसराला उद्या (मंगळवार)पासून महापालिकेतर्फे सशुल्क जीवनावश्‍यक वस्तू पुरविण्यात येणार आहेत. अयोध्या नगरीचे पूर्वेकडील कौशल्यानगरी, गजानन कॉलनी, संगीतनगर, दक्षिणेकडील सिमला कॉलनी, दत्त मंदिर परिसर, विवेकानंद कॉलनी, विठ्ठल मंदिर परिसर, पश्‍चिमेकडील आशियाना कॉलनी, साईबन कॉलनी, उत्तरेकडे किसनगिरी बाबानगर परिसर बफर झोन करण्यात आला आहे. हा परिसर 26 जुलैच्या दुपारी 2 वाजेपर्यंत कंटेन्मेंट झोन राहणार आहे. 

अवश्‍य वाचा - अहमदनगर महापालिकेत एक अधिकारी तीन कर्मचारी कोरोना बाधित

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. नगर शहर कोरोना बाधित रुग्णांचे केंद्र ठरू लागले आहे. आज महापालिकेच्या नगर-औरंगाबाद रस्त्यावरील मुख्य इमारतीत एक अधिकारी व तीन कर्मचारी कोरोना बाधित आढळून आला. त्यामुळे महापालिकेच्या इमारतीत काम करण्यास महापालिका कामगार संघटनेने विरोध केला. त्यामुळे महापालिकेतील कामकाज ठप्प आहे. 

शहरातील महापालिका प्रशासनाकडून कोरोना विषाणूंचा प्रसार करण्यासाठी राबविण्यात येत असलेली यंत्रणा कमी पडत आहे. महापालिकेत ठराविक अधिकारी व कर्मचारीच कार्यालयातील स्वतःचे दैनंदिन काम करून कोरोना विरोधातील मोहिमेत सक्रियपणे काम करत आहेत. उर्वरित कर्मचारी महापालिकेतील दैनंदिन कामही वेळेवर करत नसल्याच्या तक्रारी आहेत.