esakal | कर्जत येथील एस टी डेपोचे भूमिपूजन आ. रोहित पवार यांच्या हस्ते
sakal

बोलून बातमी शोधा

Bhumi Pujan of ST Depot at Karjat was performed by MLA Rohit Pawar.jpg

आमदार रोहित पवार म्हणाले, कर्जत तालुक्यासाठी एस टी डेपोच्या कामाला मंजुरी मिळाली असून यामुळे कित्येक वर्षाचे कर्जतकरांचे स्वप्न कृतीत उतरत आहे. या ठिकाणी   ५० बसेस उपलब्ध होणार असून यापुढे एसटी नसल्याने मतदारसंघातील कोणाला शिक्षण सोडावे लागणार नाही.

कर्जत येथील एस टी डेपोचे भूमिपूजन आ. रोहित पवार यांच्या हस्ते

sakal_logo
By
नीलेश दिवटे

कर्जत (अहमदनगर) : भक्ती बरोबर विचारांची शक्ती आणि जनशक्ती यांना साक्षी ठेवून मतदारसंघात सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानीत सर्वांगीण विकास साधायचा आहे, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले.

येथील  बसस्थानकाच्या प्रांगणात ग्रामदैवत संत श्री सदगुरु गोदड महाराज रथ व रथोत्सव प्रतिकृती लोकार्पण व कर्जत बस डेपोचे  भूमीपूजनावेळी ते बोलत होते. यावेळी बारामती ऍग्रोचे अध्यक्ष राजेंद्र पवार, विश्वस्त सुनंदा पवार, उपाध्यक्ष सुभाष गुळवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले, तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, शाम कानगुडे, विश्वस्त मेघराज पाटील, पुजारी पंढरीनाथ काकडे, गुलाब तनपुरे, मनीषा सोंनमाळी, शीतल धांडे, नितीन धांडे, प्रांत अर्चना नष्टे, पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, तहसीलदार नानासाहेब आगळे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, उपअभियंता अमित निमकर, मुख्याधिकारी गोविंद जाधव, के के थोरात कन्स्ट्रक्शनचे प्रशांत फलके, बापूसाहेब नेटके, डॉ शबनम इनामदार, स्वाती पाटील, अशोक जायभाय, सुनील शेलार, नाना निकत, यांच्यासह सर्व रथोत्सव पुजारी, मानकरी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
  
पवार म्हणाले, कर्जत तालुक्यासाठी एस टी डेपोच्या कामाला मंजुरी मिळाली असून यामुळे कित्येक वर्षाचे कर्जतकरांचे स्वप्न कृतीत उतरत आहे. या ठिकाणी   ५० बसेस उपलब्ध होणार असून यापुढे एसटी नसल्याने मतदारसंघातील कोणाला शिक्षण सोडावे लागणार नाही. तसेच ग्रामदैवत सदगुरू संत गोदड महाराज यांचा रथोत्सव आणि शहराचा अध्यात्मिकतेचा वारसा जगासमोर आणण्याचे प्रयत्न असून ते साध्य झाले. पाऊस पडला या सुंदर सोहळ्यास संत श्री सदगुरु गोदड महाराजाचा आशीर्वाद देखील मिळाला. राजकारणात शब्द देऊन तो पूर्ण करण्याचा आमच्या सर्वाचा प्रयत्न राहील. तसेच तालुक्यातील अनेक रस्त्याचे काम पूर्णत्वास आले असून उर्वरित सर्व कामे लवकर मार्गी लागणार आहेत. तसेच युवकांना स्वावलंबी करण्यासाठी एमआयडीसी मिळणार आहे. सीना आणि कुकडी चारीचे कामे सुद्धा सुरू आहेत. आगामी काळात ही कामे सुद्धा प्राधान्याने पूर्ण केली जातील.
 
विजय गीते म्हणाले, तालुक्यातील सर्वाधिक विद्यार्थीवर्ग एसटीने प्रवास करीत आहे. येथे डेपो झाल्यामुळे दळणवळण सुविधा मिळण्यासह त्यामध्ये आणखी वाढ होणार आहे. राज्यातील २५१ आगाराचे भूमिपूजन आमदार पवार यांच्या हस्ते पार पाडले याचा अभिमान आहे. यावेळी राजेंद्र फाळके प्रवीण घुले, बबन नेवसे, भालचंद्र कुलथे यांची मनोगते झाल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विशाल मेहत्रे यांनी केले तर विजय गीते यांनी आभार मानले. 

कर्जतला डेपो नसल्याने येथे विविध मार्गावर एसटी बसेस नसल्याने अनेकांनी शिक्षण सोडल्याची भावना आपल्याकडे व्यक्त झाली होती. तसेच निवडणुकी काळात विद्यार्थीनीनी कर्जतला आगार असावे, अशी अपेक्षा आणि मागणी केली होती. या रुपात ती पूर्ण झाली असे आ. रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

साधेपणा भावला

या कार्यक्रमासाठी स्टेजवर पदाधिकारी आणि अधिकारी बसले होते मात्र रोहित पवार यांचे वडील बारामती एग्रो चे अध्यक्ष राजेंद्र पवार व आई विश्वस्त सुनंदा पवार या सर्वसामान्य प्रमाणे नागरिकांत बसल्या होत्या, त्यांचा साधेपणा सर्वांना भावला.