दर गुरुवारी धावणार भुसावळ-दौंड पॅसेंजर

भारतीय रेल्वे
भारतीय रेल्वेसंग्रहित छायाचित्र
Summary

अनेक जलद गाड्या या अनेक वर्षांपासून दौंड-मनमाड मार्गे धावतात. परंतु प्रवाशांना पुण्याहून येतांना थेट मनमाडचे तिकिट घ्यावे लागते.

श्रीरामपूरः मध्य रेल्वेच्या पुणे रेल्वे स्थानकावरुन सुटणारी झेलम, हावडा एक्सप्रेस व अन्य एक्स्प्रेसला दौंड-मनमाड मार्गावर थांबा असलेल्या येथील (बेलापूर) रेल्वेस्थानकाची तिकिटे मिळत नाही. अनेक प्रवासी या रेल्वेगाड्यातून श्रीरामपूरला जाण्यासाठी प्रवास करतात, तेव्हा पुणे-मनमाड आरक्षणाचे तिकिट घ्यावे लागते. त्यामुळे ज्या ठिकाणी रेल्वेला थांबा आहे. त्या ठिकाणचे पुण्याहून तिकिट देण्याची मागणी प्रवाशी संघटनेने केली आहे.

येथील अनेक व्यापारी, विद्यार्थी व काही नोकरदारांना नेहमी रेल्वेने पुण्याला जावे लागते. पुणे-श्रीरामपूर जलद रेल्वेला १८५ रुपये, अतिजलद रेल्वेला २४० रुपये तिकिट आहे. परंतु झेलम, हावडा एक्स्प्रेसने प्रवास केल्यास मनमाडचे तिकिट घ्यावे लागते. त्यामुळे प्रवाशांना सुमारे ४० ते ५० रुपये अधिक भुर्दंड सहन करावा लागतो. (Bhusawal-Daund passenger train will run every Thursday)

अनेक जलद गाड्या या अनेक वर्षांपासून दौंड-मनमाड मार्गे धावतात. परंतु प्रवाशांना पुण्याहून येतांना थेट मनमाडचे तिकिट घ्यावे लागते. म्हणून पुणे ते श्रीरामपूर रेल्वेने प्रवास करणारांना मनमाडपर्यंत तिकिट देवून प्रवाशांना दिलासा देण्याची मागणी प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष रणजित श्रीगोड यांनी केली आहे.

दरम्यान, दौंड-मनमाड रेल्वे मार्गावर आता दर गुरुवारी भुसावळ ते दौंड ही प्रवासी रेल्वेगाडी धावणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी या रेल्वेगाडीचा लाभ घेण्याचे, आवाहन प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रणजित श्रीगोड यांनी केले आहे. भुसावळ दौंड ही भुसावळ येथून सकाळी सहा वाजून १५ मिनिटांना सुटणार आहे.

जळगाव सहा वाजुन ४० मिनिटे, चाळीसगाव सव्वा आठ वाजता, मनमाडला सव्वा नऊ वाजता पोहचून दौंड मार्गाने पुढे कोपरगाव येथे सकाळी १० वाजून २० मिनिटे, बेलापूर येथे ११ वाजून दहा मिनिटे व नगरला दुपारी एक वाजता व दौंडला चार वाजून ३५ मिनिटांनी पोहचेल. रेल्वेगाडी मुक्कामी थांबेल. त्यानंतर दौंड भुसावळकडे जाण्यासाठी साडेबारा वाजता सुटेल. भुसावळला रात्री आठ वाजून ५५ मिनिटांनी पोहचेल. सदर रेल्वे प्रवासासाठी प्रवाशांना आरक्षण तिकिट घ्यावे लागणार असल्याची माहिती श्रीगोड यांनी दिली.(Bhusawal-Daund passenger train will run every Thursday)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com