वीकेंड लॉकडाउनची मेहनत गेली पाण्यात, सगळीकडे उसळली गर्दी

Big crowd in the market after the weekend lockdown
Big crowd in the market after the weekend lockdown
Updated on

सोनई (अहमदनगर): वीकेंड संपल्यावर आज पुन्हा एकदा  बाजारपेठा,हाॅटेल व भाजी मंडई गर्दीने फुलल्या आहे. सोशल डिस्टन्सिग सह सर्वत्र शासन नियमाचेउल्लंघन पाहण्यास मिळाले.

सोनईसह घोडेगाव, शनिशिंगणापुर, चांदे, शिरेगाव, 
वडाळा बहिरोबा, करजगाव व परीसरात शनिवार आणि रविवारी सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवून लाॅकडाऊन पाळण्यात आला. रुग्णालय व औषधाचे दुकान वगळता सर्व दुकाने सलग दोन दिवस बंद राहिल्याने आज अत्यावश्यक वस्तू घेण्यासाठी सर्वत्र एकच गर्दी झाली होती.

सोनई येथील कौतुकी नदीपात्रातील मोकळ्या व अरुंद जागेत भाजीपाला बाजार भरला होता.येथे सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.येथे कोरोना संसर्गाची गंभीर स्थिती असतानाही बाजारात सोशल डिस्टन्सिगचा फज्जा पाहण्यास मिळाला. अनेक ग्रामस्थांना मास्क नव्हते.

दोन दिवसाच्या विकेंड लाॅकडाऊन मध्ये आडोशाला असलेल्या अनेक दुकाना सुरु होत्या. अनेक हाॅटेल मागच्या दाराने सुरु होते.ग्रामसमिती व पोलिस यंत्रणेचा कुठलाच धाक पाहण्यास मिळाला नाही.मुळा कारखाना गट भागात काही व्यावसायिकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. 
तीन-चार दिवसाने नियमित लाॅकडाऊन सुरु होण्याच्या भितीने आवश्यक किराणा व भाजीपाला घेवून ठेवण्यासाठी सर्वच गावात लगबग सुरु आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com