

नेवासे : बिग मी इंडिया प्रा. लि. कंपनीच्या माध्यमातून ठेवीदारांना जादा परतावा (व्याज) देण्याचे आमिष दाखविणारा कंपनीचा प्रवर्तक सोमनाथ एकनाथ राऊत (वय ३८) याच्यासह सात संचालकांवर तोफखाना पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. राऊत याने कुकाणा अर्बन मल्टीस्टेट निधी सोसायटी स्थापन केली होती. त्यामुळे तेथील ठेवीदारही धास्तावले आहेत.
सोमनाथ एकनाथ राऊत याचे मूळ गाव हे पाथरवाला (ता. नेवासे) आहे. हे गाव कुकाणा या गावापासून सुमारे पाच-सहा किलोमीटर अंतरावर आहे. त्याच्या वडिलांनी लोकसभा निवडणूक लढविली होती. त्यांचा पराभव झाला. परंतु, लोकांनी त्यांना ‘खासदार’ ही उपाधी दिली. मित्र परिवार आणि ओळखीचे लोक त्यांना ‘खासदार’ म्हणतात.
सोमनाथ याने अनेक उद्योग-धंदे केले. त्याचे कारनामे आता उघडकीस येत आहेत. त्याचे राहणीमान ऐषआरामाचे होते. सोमनाथ याने एक न्यूज चॅनेल सुरू केले होते. चारचाकी वाहनावर त्या चॅनेलचा लोगो आणि नाव टाकून परिसरात फिरत असत. कुकाणा आणि परिसरातील लोकांना त्याचे उद्योग-धंदे माहिती असल्याने ओळखीचे कोणी त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हते. त्याने अहमदनगरला बिग मी इंडिया प्रा. लि. कंपनी स्थापन केली. या कंपनीची जाहिरात राज्यभर केली. त्याच्या आकर्षक योजनांच्या आमिषाने अनेक गुंतवणूकदार बळी पडले.
बिग मी इंडिया प्रा. लि. कंपनीच्या विरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात फसवणुकीचा आणि महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचे स्वरुप आणि व्याप्ती पाहून आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे गुन्हा पाठविण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
- ज्योती गडकरी,
पोलिस निरीक्षक, तोफखाना पोलिस ठाणे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.