Video : कोरोनापासून बचावासाठी त्याने बनवली बाईक, बघा तर खरं

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 May 2020

ही बाईक बनवणाऱ्याने आपला व्हिडिओ समाजमाध्यमावर पोस्ट केला आहे. तो शेअर होतो आहे. प्रत्येकालाच या व्हिडिओचे कौतुक वाटत आहे.

नगर ः कोरोनापासून बचाव करण्यासाठी जगभरातील संशोधक, सरकार जीवाचे रान करीत आहेत. जोपर्यंत त्यावर लस शोधून काढली जात नाही तोर्यंत काही गोष्टी आपल्या हातात आहेत. त्याचा उपयोग आपण करू शकतो. त्या द्वारे कोरोनाचा प्रादूर्भाव रोखता येईल. सोशल डिस्टन्सिंग त्यातीलच एक प्रकार आहे.

सामाजिक अंतर पाळले तरच कोरोनाला आळा बसू शकतो. त्यासाठी सरकारने लॉकडाउन केले आहे. वेळोवेळी त्यात वाढही केली जात आहे. सरकार आदेश काढत आहेत. मात्र, लोकांकडून त्याला हरताळ फासला जात आहे. परंतु या लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, यासाठी जुगाड केले आहे. अशीच जुगाड केलेली सोशल डिस्टन्सिंगची बाईक व्हायरल होते आहे.

ही बाईक बनवणाऱ्याने आपला व्हिडिओ समाजमाध्यमावर पोस्ट केला आहे. तो शेअर होतो आहे. प्रत्येकालाच या व्हिडिओचे कौतुक वाटत आहे.

 

बाईकवर सोशल डिस्टन्सिंग पाळणे म्हणजे अशक्य वाटणारी गोष्ट आहे. परंतु त्या व्यक्तीने त्यासाठी तशी भन्नाट बाईक तयार केली आहे. आपल्या लेकीला शाळेत सोडण्यासाठी या बाईकचा उपयोग होऊ शकतो, असे त्याचे म्हणणे आहे. या व्हिडिओला लाईक करून त्याचे कौतुकही केले जात आहे.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A bike that observes social distance look at the fact