
नगरमध्ये आज जाहीर झालेल्या युवा मोर्चाच्या कार्यकारिणीतील निवडीवरून दिसून आले. या कार्यकारिणीत नगर आणि नेवासा तालुक्याला झुकते माप देण्यात आलं आहे.
नगर ः काँग्रेसच्या ध्येयधोरणावर भाजपचे चाणक्य नेहमी टीका करतात. विशेषतः काँग्रेसच्या घराणेशाहीवर त्यांचा नेम असतो. मात्र, पार्टी विथ डिफरन्स म्हणवून घेणाऱ्या भाजपलाही घराणेशाहीची बाधा झाली आहे. लोकसभा, विधानसभे निवडणुकीतही नेत्यांच्या घरात तिकीट वाटप होते. मात्र, आता अगदी युवा कार्यकारिणीतही ही घराणेशाही आली आहे.
नगरमध्ये आज जाहीर झालेल्या युवा मोर्चाच्या कार्यकारिणीतील निवडीवरून दिसून आले. या कार्यकारिणीत नगर आणि नेवासा तालुक्याला झुकते माप देण्यात आलं आहे.
भाजपा युवा मोर्चाच्या नगर (दक्षिण ) जिल्हा कार्यकरणी आज जिल्हाअध्यक्ष अरुण मुंढे यांनी जाहीर केली. जिल्हाध्यक्ष पदी सत्यजित कदम यांची निवड करण्यात आली. सरचिटणीस पदी अक्षय कर्डिले, गणेश कराड यांची निवड करण्यात आली.
उपाध्यक्षपदी शिवाजी बेरड, अमोल शेलार, तुषार पवार, उमेश भालसिंग, महेंद्र तांबे, धनंजय मोरे, अमोल गर्जे, संजय कार्ले यांची निवड करण्यात आली. चिटणीसपदी अनिल गदादे, उदय पवार, सचिन पालवे, राजकुमार लोखंडे, दत्तप्रसाद मुंदडा, अभिजित रोहकले, मच्छिंद्र बर्वे, अभिजित जवादे यांचीच निवड करण्यात आली.
प्रसिद्धीप्रमुख - राहुल संभाजी लांडे ,खजिनदार -विवेक भानुदास बेरड यांची निवड करण्यात आली. जिल्हा कार्यकारणी सदस्य खालीलप्रमाणे : गणेश अशोक झावरे , भाऊसाहेब निवृत्ती खुळे ,प्रभाकर सोपान जाधव ,विकास संभाजी काळे ,सागर बाळासाहेब कल्हापुरे ,निलेशकुमार साहेबराव दरेकर ,योगेश आदिनाथ कासार ,संजय भाऊसाहेब कदम ,ईश्वर दादासाहेब मुरुमकर ,हरिभाऊ मछिंद्र वायकर ,विक्रमसिह शिवाजीराव जाधव ,सोमनाथ वाखारे ,गोपिनाथ जगताप ,अमोल बावडकर ,उदय लक्ष्मण शिंदे ,सोमनाथ विष्णुपंत अकोलकर ,राहुल केशरचंद बंब ,पांडुरंग नामदेव मोरे आदीचा जिल्हा कार्यकारणीत समावेश करण्यात आला.
संपादन - अशोक निंबाळकर