Ahmednagar : साहेब, रस्ता तातडीने दुरुस्त करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Ahmednagar

Ahmednagar : साहेब, रस्ता तातडीने दुरुस्त करा

अकोले : साहेब, आमचा रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे शाळेत खोल खड्ड्यांतून व पाण्यातून शाळेत यावे लागते. हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अशी विनंती माजी मंत्री मधुकर पिचड यांच्याकडे एकदरे, आडसरे गावांतील विद्यार्थ्यांनी केली.

एकदरे, आडसरे परिसरात ढगफुटी झाल्याने रस्ते वाहून गेल्यामुळे, विद्यार्थ्यांना वाडीतून खोल पाण्यातून रस्ता काढत शाळेत यावे लागते. या रस्त्याची पाहणी करण्यासाठी माजी मंत्री पिचड, दिनेश शहा, सचिन पराड, सरपंच साबळे आले असता, विद्यार्थ्यांनी त्यांच्यासमोर कैफियत मांडली. दीपिका साबळे ही आठवीत शिकणारी विद्यार्थिनी म्हणाली, ‘‘साहेब, दोन दिवसांपूर्वी अचानक आम्हाला निरोप आला. ‘धरण फुटले. तुम्ही असाल त्या परिस्थितीत वाडी सोडून गावात जा.’ त्या काळ्या रात्री मी व वाडीतील शंभर माणसे सैरावैरा पळत सुटलो व गावात पोचलो. त्यावेळी कमरेला पाणी लागले होते.

आम्ही वाचलो, मात्र शेती, जनावरे, संसारोपयोगी साहित्य पाण्यात वाहून गेले. घरेही पडली. आज आम्ही कसेबसे सावरलो आहोत. आता पुन्हा घरे उभारण्यासाठी पंचनामे होणे आवश्यक आहे. रस्ता होणे आवश्यक आहे. काही पण करा. मात्र, घराकडे जाण्यासाठी रस्ता करून द्या, साहेब.

पिचड यांनी विद्यार्थ्यांची कैफियत ऐकून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन यांच्याशी संपर्क करीत तातडीच्या मदतीची मागणी केली. कुटुंबे सावरण्यासाठी आदिवासी विभागातून निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.

Web Title: Bjp Former Minister Madhukar Pichad School Students Road Corrected Ahmednagar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..