श्रीगोंदे पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपने उलटवली बाजी

bjp
bjpesakal

श्रीगोंदे (जि.अहमदनगर) : पंचायत समितीच्या उपसभापती निवडीत सोमवारी (ता.९) नाट्यमय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या (national congress party) हाती सत्तेची चावी असतानाही, ऐन वेळी सूत्रे हाती घेणाऱ्या साजन पाचपुते यांनी बाजी पलटवली. भाजपचे फुटलेले दोन सदस्य पुन्हा गोटात ओढत आघाडीचे दोन सदस्य फोडल्याने भाजपच्या मनीषा कोठारे यांची उपसभापतिपदी बिनविरोध निवड झाली. या खेळीत साजन पाचपुते ‘किंगमेकर’ ठरले. त्यांची ही राजकारणातील एन्ट्री मानली जाते.

भाजपने बाजी उलटवली; साजन पाचपुते ठरले ‘किंगमेकर’

राष्ट्रवादीच्या रजनी देशमुख यांनी उपसभापतिपदाचा राजीनामा दिल्याने आज निवडीसाठी सभा बोलाविण्यात आली होती. पंचायत समितीची सत्ता राष्ट्रवादीच्या ताब्यात होती. गेल्या वेळच्या निवडीत भाजपचा एक सदस्य फुटल्याने याही वेळी आघाडीकडेच उपसभापतिपद जाईल, असे जाणकार सांगत होते. त्यातच भाजपचा एक सदस्य राष्ट्रवादीने फोडल्याने सगळीच गणिते एकतर्फी झाली होती. मात्र, ‘साजन शुगर’चे अध्यक्ष साजन पाचपुते यांनी या निवडीत एन्ट्री केली. त्यांनी राष्ट्रवादीच्या रजनी देशमुख व काँग्रेसचे जिजाबापू शिंदे यांना फोडले. या घडामोडी विळद घाटातून विखे पाटील, तसेच आमदार बबनराव पाचपुते यांच्या सूचनेवरून सुरू होत्या. मात्र, तीत साजन यांची भूमिका निर्णायक ठरत होती. आज (ता.९) सकाळी भाजपच्या, यापूर्वी दुसऱ्या गोटात गेलेल्या दोन सदस्यांनाही सोबत घेत पाचपुते यांनी राजकारणात जोरदार एन्ट्री केली. बहुमत होत असल्याचे लक्षात आल्यावर राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवार कल्याणी लोखंडे यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला. आघाडीकडे लोखंडे यांच्यासह अण्णासाहेब शेलार व सभापती गीतांजली पाडळे हे तीनच सदस्य राहिले. आमदार पाचपुते यांच्या उपस्थितीत सदस्यांच्या झालेल्या बैठकीत कोठारे यांना उपसभापतिपदाची संधी देण्याचा निर्णय झाला. त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

नाहाटा ठरले हीरो

तोडाफोडीच्या राजकारणात तरबेज असलेल्या बाळासाहेब नाहाटा यांनी आज हरलेली बाजी जिंकण्यासाठी पाचपुते गटाला मदत केली. साजन पाचपुते यांच्यासोबत नाहाटा असल्याने काँग्रेस आघाडी ही लढाई हरल्याची चर्चा आहे. नाहाटांची सोबत व विखे कुटुंबासोबत आमदार पाचपुते यांचा अनुभव भाजपच्या आजच्या विजयात उपयोगी ठरल्याचे बोलले जाते.

bjp
मुलं झाली निष्ठुर, माजी सैनिक दांम्पत्याना काढले घराबाहेर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com