esakal | भाजपतर्फे राहुरीत माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या कार्यालयात श्रीरामाची पूजा
sakal

बोलून बातमी शोधा

BJP ShriRam at the office of former MLA Shivaji Kardile in Rahuri

भाजपतर्फे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या कार्यालयात भगवान श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

भाजपतर्फे राहुरीत माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या कार्यालयात श्रीरामाची पूजा

sakal_logo
By
विलास कुलकर्णी

राहुरी (अहमदनगर) : भाजपतर्फे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या कार्यालयात भगवान श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

त्यानंतर कार्यालयासमोर फटाके फोडून, मोतीचूर लाडूंच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. श्रीरामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला. अयोध्या येथे श्रीराम जन्मभूमीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भव्य मंदिराच्या कामाचा शुभारंभ झाला. आजचा दिवस दिवाळी पेक्षाही मोठ्या सण-उत्सवाचा दिवस आहे, असे माजी आमदार कर्डिले यांनी सांगितले. 

श्रीरामाच्या प्रतिमेचे माजी आमदार कर्डिले यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आले. देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम, ज्येष्ठ नेते आसाराम ढूस, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, रवींद्र म्हसे, चाचा तनपुरे, शिवाजीराव सोनवणे, गणेश खैरे, चांगदेव भोंगळ, कार सेवक राजेश उपाध्ये, राजेंद्र उंडे, शहाजी ठाकूर, सुरसिंग पवार, किशोर वने, केशव कोळसे, गोरक्षनाथ तारडे, बाळकृष्ण कोळसे, दत्तात्रेय ढूस, नामदेव कांबळे उपस्थित होते. 

राहुरी शहरात श्रीराम गणेश मंडळ (कासार गल्ली), व्यापारी पतसंस्थेतर्फे नवी पेठेत, शिवाजी चौकात जुनी पेठ येथे श्रीरामाच्या प्रतिमांचे पूजन करून, फटाके फोडून श्रीराम भक्तांनी आनंदोत्सव साजरा केला. देवळाली प्रवरा येथे श्रीराम मंदिरासमोर फटाके फोडून भाविकांनी आनंद व्यक्त केला. 

संपादन : अशोक मुरुमकर