मकर संक्रांतीला शिर्डीत दर्शन पासची ब्लॅकने विक्री, भाविकांचा हिरमोड

Black sale of Darshan Pass in Shirdi on Makar Sankranti
Black sale of Darshan Pass in Shirdi on Makar Sankranti
Updated on

शिर्डी ः यंदाची संक्रांत सुलभ साईदर्शनावर आली. त्यामुळे तिळगूळ आणि गोड बोलणे राहिले बाजूला; दर्शनार्थी भाविकांच्या वाट्याला मनस्ताप आला.

सक्तीचा दर्शन पास मिळविण्यासाठीच भाविकांची झुंबड उडाली. व्यवस्थापनाने दर्शन पास देणे कधी बंद, तर कधी सुरू, असा खेळ केला. त्यामुळे भाविकांना विनाकारण तीन-चार तास रांगेत तिष्ठत उभे राहावे लागले. अनेकांची सहनशीलता संपल्याने शारीरिक अंतर राखण्याचा फज्जा उडाला. 

गर्दी असो वा नसो; दर्शन पास भाविकांसाठी सक्तीचा करण्यात आला. सुरक्षाव्यवस्थेचा जाच आणि मनस्ताप, यामुळे स्थानिक भाविक अद्यापही साईदर्शनापासून लांबच आहेत. मात्र, मकर संक्रांतीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली. दर्शन पास मिळविण्यासाठी लांबलचक रांगा लागल्या.

दर्शन पासची सक्ती नसती, तर तेवढ्या वेळात त्यांचे साईदर्शन झाले असते. संस्थान व्यवस्थापनाने नवनवे प्रयोग करण्याऐवजी भाविकांना सुलभ व झटपट साईदर्शनावर भर द्यायला हवा. 
गर्दीच्या काळात मोफत दर्शन पासची सक्ती रद्द करावी. ते जमत नसेल, तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, अशी मागणी भाविक करीत होते.

दुर्दैव असे, की दर्शन पासची काळ्या बाजाराने विक्री झाल्याच्या तक्रारी काही भाविकांनी केल्या. एकच गोंधळ उडाल्याने सुधाकर शिंदे, रमेश गोंदकर, माजी उपनगराध्यक्ष नीलेश कोते, आप्पासाहेब कोते यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांचे त्याकडे लक्ष वेधले. काही वेळाने साईसंस्थानाने घाईने, पास देण्याची व्यवस्था वाढविली. तरीही अनेक भाविक खिन्न मनाने साईदर्शन न घेताच माघारी परतले. अहमदनगर

साईमंदिर दर्शनासाठी खुले झाले. मात्र, जाचक अटींमुळे आजवर माझ्यासारखे अनेक ग्रामस्थ अद्याप मंदिरात गेलेले नाहीत. संक्रांतीला साईदर्शन घडले. मात्र, स्थानिकांसाठी स्वतंत्र दर्शनव्यवस्था नाही. शिर्डीत गर्दी नसेल त्याच वेळी दर्शनव्यवस्था सुरळीत राहते. गर्दी झाली की कोलमडते. काय चालले आहे, ते कळायला मार्ग नाही. भाविकांना झालेला मनस्ताप पाहवत नव्हता. 
- सुधाकर शिंदे, साईंच्या सेवेकऱ्यांचे वंशज 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com