esakal | नेवासे तालुक्यात दूध दरासाठी भाजपकडून रास्ता रोको
sakal

बोलून बातमी शोधा

Block road from BJP for milk price in Nevasa taluka

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शनिवारी (ता. १) नेवासे तालुका भाजपच्या वतीने नेवासे येथे दूध ओतून रास्ता रोको आंदोलन केले.

नेवासे तालुक्यात दूध दरासाठी भाजपकडून रास्ता रोको

sakal_logo
By
सुनील गर्जे

नेवासे (अहमदनगर) : दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शनिवारी (ता. १) नेवासे तालुका भाजपच्या वतीने नेवासे येथे दूध ओतून रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी आंदोलकांच्या हातात शेतकऱ्यांच्या दुधाला भाव ना देणाऱ्या सरकारचा निषेध असो असे फलक होते. 

नेवासे येथील पंचायत समिती चौकात भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, तालुकाध्यक्ष नितीन दिनकर, ज्ञानेश्वर पेचे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. प्रसंगी तहसीलदार रुपेश सुराणा व पोलिस निरीक्षक रणजित डेरे यांनी आंदोलकांचे निवेदन स्विकारले.

दूध उत्पादनक शेतकऱ्यांना प्रति लिटर १० रुपयांचे अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावे. दूध भुकटीच्या निर्यातीसाठी प्रति किलो ५० रुपये अनुदान द्यावे तसेच गाईच्या दुधाला ३० रुपयांचा दर द्यावा या मागण्यांचा त्यात समावेश आहे.
शासनाने याप्रश्नी न्यायभूमीका न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला. त्यांनी दुधाच्या भाव वाढीबाबत शासन उदासीन असल्याची टीका केली.

आंदोलकांचे भाजपचे ज्येष्ठ नेते रामभाऊ खंडाळे,  जिल्हाउपाध्यक्ष अंकुश काळे, शहराध्यक्ष मनोज पारखे, निरंजन डहाळे, नगरसेवक सुनील वाघ, गटनेते सचिन नागपुरे,  राजेंद्र मापारी,  संदीप आलावणे,   सतीश गायके,   ज्ञानेश्वर टेकाळे, विवेक ननावरे आदी सहभागी झाले होते.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image