esakal | बरोबर उत्तर चुकीचे ठरवले; चुक लक्षात आल्यानंतरही गुण वाढवून देण्यास मंडळाचा नकार
sakal

बोलून बातमी शोधा

Board refuses to increase the marks of Pratik Pipada students in Rahata taluka

गणेशनगर येथील बारावीची परिक्षा दिलेल्या प्रतिक पुखराज पिपाडा यास फिजीक्स विषयात ११ गुण कमी देण्यात आले.

बरोबर उत्तर चुकीचे ठरवले; चुक लक्षात आल्यानंतरही गुण वाढवून देण्यास मंडळाचा नकार

sakal_logo
By
सतीश वैजापूरकर

राहाता (अहमदनगर) : तालुक्यातील गणेशनगर येथील बारावीची परिक्षा दिलेल्या प्रतिक पुखराज पिपाडा यास फिजीक्स विषयात ११ गुण कमी देण्यात आले. ही बाब त्याच्या उत्तरपत्रिकेच्या फेरतपासणीत निष्पन्न झाली. तसा लेखी अहवाल महाविद्यालयाकडून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे धाडण्यात आला.

त्यास केराची टोपली दाखवीत विद्यापिठातील अधिकाऱ्यांनी गुण वाढवून देण्यास नकार कळवीला. त्याचे नातेवाईक असलेले गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी या प्रकाराची चौकशी केली जावी. तसेच या बेजाबदारपणामुळे मानसिक तणावाखाली आलेल्या प्रतिक चे काही बरेवाईट झाल्यास त्यास सबंधित अधिका-यांनी जबाबदार धरावे. अशी मागणी करणारे पत्र विद्यापिठाला पाठविले आहे.

प्रतिकला बारावीच्या परिक्षेत फिजीक्स विषयात 83 गुण मिळाले. हे गुण कमी असल्याची शंका आल्याने त्याने विद्यापिठा सोबत पत्रव्यवहार करून उत्तरपत्रिकेची फोटो कॉपी मागावून घेतली. ८ ऑगस्टला बोर्डाकडे पाठविलेली फोटो कॉपी त्याला मिळाली.

श्रीरामपूर येथील आरबीएनबी महाविद्यालयातील फिजीक्स विषयाचे मॉडेटर एन. जी. पठारे यांनी ती तपासली. त्यात एक प्रश्न बरोबर सोडविण्यात आला असताना तो चुक असल्याचे गृहित धरून ११ गुण कमी दिल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी आपल्या स्वाक्षरीनीशी ही बाब उत्तरपत्रिकेच्या फोटो कॉपीवर नोंदविली. या महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी देखील सही व शिक्का मारून त्यावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर ही फोटो कॉपी बोर्डाकडे धाडण्यात आली. काही दिवसांपूर्वी मंडळाच्या विभागीय सचिवांकडून मेलद्वारे उत्तर पाठविण्यात आले. त्यात आपली उत्तरपत्रिका बरोबर तपासण्यात आली होती. त्यामुळे पूर्वी दिलेले गुण बरोबर आहेत, असे कळविण्यात आले. हे पत्र मिळाल्यानंतर प्रतिक कमालीचा नाराज झाला.

आठ दिवसांपासून त्याने सबंधित विभागा सोबत अनेकदा मोबाईलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यास प्रतिसाद मिळाला नाही. एकदा त्याचा फोन कुणीतरी उचलला आणि समक्ष येऊन भेटा असे सांगून ठेवून दिला. 

संपादन : अशोक मुरुमकर