esakal | देशी गायींमुळे शेवगावचा शेतकरी कमावतोय लाखो; दूध विकतो १२० रूपयांनी, तर गोमूत्रला ४० रूपये लिटरचा भाव
sakal

बोलून बातमी शोधा

Bodhegaon farmer earns lakhs of rupees due to native cows

गायीच्या गो-मुत्रालाही ४० रुपये लिटरपर्यंत भाव मिळत आहे. असे ते अवर्जून सांगतात. प्रत्येक गायीच्या दुधाची चव व गुण धर्म वेगळे- वगळे आहेत. शेद्रीय पद्धतीने गायींचे शेण व मुत्रापासून तयार केलेले 'गो-शेनामृतस्लरी' ते शेतीला खत म्हणून वापरतात. 

देशी गायींमुळे शेवगावचा शेतकरी कमावतोय लाखो; दूध विकतो १२० रूपयांनी, तर गोमूत्रला ४० रूपये लिटरचा भाव

sakal_logo
By
प्रवीण पाटील

बोधेगाव : गावराव किंवा देशी गायींच्या दुधाचे अनेक गुणधर्म आहेत. परंतु या गायी व्यावहारिकदृष्ट्या परवडत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दारातील या गायींची दावण हटली. त्यांची जागा घेतली म्हशी आणि संकरीत गायींनी. परंतु शेवगाव तालुक्यातील बोधेगावच्या शेतकऱ्याने उलट्या दिशेने प्रवास करीत दारातील जरशी आणि म्हशींची दावण हटवून पुन्हा देशी गायी पाळल्या. त्यातून तो लाखो कमावतोय. त्यांचा इतर शेतकरीही आदर्श घेत आहेत.

दोन वर्षापूर्वी आपल्या शेतातील दोन एकर जागेत 'गोसंवर्धन' केंद्रांची निर्मिती केली. त्यात विविध जातींच्या देशी गायीचे पालन सुरु केले. आज या ठिकाणी चारशेच्या जवळपास लहान-मोठया गायी आहेत.

तीन वेगवेगळ्या गोठ्यात दुभत्या गायी, लहान वासरे व गाभण गायी यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ही किमया बोधेगाव येथील माजी जिल्हा परीषद सदस्य पै. नितीन काकडे यांनी करुन दाखवत शेतक-यांपूढे एक आदर्श निर्माण केला आहे. या गोसंवर्धन केंद्राला भेट देण्यासाठी परिसरातील शेतकरी लॉकडाऊननंतर पुन्हा येऊ लागले आहेत.

हेही वाचा - वातावरण बदलामुळे येतोय ताप, त्यामुळे वाढतोय हॅडॅक

पै. काकडे कुस्त्या करत असल्यामुळे लहानपणापासूनच त्यांना दुधाची आवड असल्याने ते अनेक वर्षापासून म्हशीचे दुध प्यायचे. परंतु पुढे-पुढे म्हशीच्या दुधामुळे पोटाचे व त्वचेचे विकार, कफ अशा समस्या त्यांना जाणवू लागल्या. तेव्हा त्यांना एका आयुर्वेद तज्ज्ञाने म्हशीच्या दुधाऐवजी गावराण गायीचे दुध पिण्याचा सल्ला दिला. त्यांनी तो लगेच आमलात आणला.

गायीचे दुध सेवन केल्यामुळे काही दिवसातच त्यांच्या आरोग्याच्या सगळ्याच समस्या दूर झाल्या. लगेच काकडे यांनी आपल्या गोठ्यात असलेल्या ७० म्हशी आठ दिवसांच्या आत विकून थेट राजस्थान गाठले. तेथून एक सहिवाल जातीची देशी गाय आणली. अन् तिथून पूढे गायीचे पालन करण्याचा त्यांना जणू लळाच लागला.

सोळा जातीच्या आहेत गायी

आज त्यांच्या गोसंवर्धन केंद्रात सहिवाल, राठी, गीर, थारपारकर, कॉकरेज, रेडसिंधी, लालकंधार, मालवी, नागोरी, पवॉर, भगनाडी, देवनी, निमाडी, कृष्णावल्ली, अमृतमहल, खिल्लार अशा विविध देशी जातीच्या गायी आहेत. या गायींचे वैशिष्ट्य म्हणजे म्हशीपेक्षा निम्माच चारा यांना लागतो. दुध मात्र प्रत्येक गाय १५ लिटरच्या पुढेच देते.

गोमूत्र विकते ४० रूपये लिटर

गायीच्या गो-मुत्रालाही ४० रुपये लिटरपर्यंत भाव मिळत आहे. असे ते अवर्जून सांगतात. प्रत्येक गायीच्या दुधाची चव व गुण धर्म वेगळे- वगळे आहेत. शेद्रीय पद्धतीने गायींचे शेण व मुत्रापासून तयार केलेले 'गो-शेनामृतस्लरी' ते शेतीला खत म्हणून वापरतात. 

या गायींच्या चा-यासाठी शतावरी, अश्वगंधा, मुसळी, बीट, मका अशी वैरण ते आपल्या शेतातच तयार करतात. वेगवेगळी कडधान्यांची भुसे, मुरघास  गायींना चारा म्हणून दिला जातो. प्रत्येक गायीच्या दुधातील घटक वेगवेगळे आढळत असल्याने धार काढल्यानंतर सर्व गायींचे दूध एकत्र केले जाते. हे दूध आरोग्यासाठी खुप गुणकारी ठरत असल्याचा अनुभव अनेकांना आल्यामुळे त्यांच्याकडील दुधाला व तुपाला खुप मागणी आहे.

दूध १२० रूपये लिटरने विक्री

सहीवाल जातीच्या गायीचे दुध पुणे येथे १२० रुपये लिटरने विकले जात असातांना काकडे ते ७० रुपये लिटरने परीसरातील ग्राहकांना देत आहेत.

जर्शी गायींना दाखवला बाजार

गायी पाहण्यासाठी आलेले शेतकरी काकडे यांच्याकडून गो-पालनाचे महत्व व फायदे ऐकून चकीत होतात. त्यांची प्रेरणा घेवून अनेकांनी आपल्याकडील म्हशी व जर्शी गायी बाजारात विकून गावरान गायीचे पालन सुरु केले आहे. त्यांच्या या प्रयत्नाला मोठे यश आले असून गायींची संख्या परिसरात झपाट्याने वाढत आहे.
 

विदेशी गायीचे दूध जास्त तर म्हशीचे दुध घट्ट असल्याने त्यांच्या संख्येत वाढ होत आहे. देशी गायींच्या संख्येत घट होत आहे. परंतु म्हशीचे दुध मनुष्यास व लहान मुल्याच्या शरीरास हानिकारक असल्याचे माझ्या अनुभवातून सांगतो. या दूधामुळे आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येक शेतक-यांच्या गोठ्यात गावराण गायींची संख्या वाढल्यास आरोग्य उत्तम राहील.  त्यामुळेच मी हा प्रयत्न केला असून त्यास यश आले आहे. 
- पै.नितीन काकडे,  गोपालक बोधेगाव, शेवगाव.  
 
गायीच्या दुधाला म्हशीच्या दुधा पेक्षा चांगला भाव मिळतो. अनेक राज्यातील गोशाळेतून तसेच खाजगी शेतक-यांकडून विविध जातीच्या देशी गायी विकत घेण्याकडे येथील शेतक-यांचा कल वाढला आहे. पशुसंवर्धन विभाग अशा शेतक-यांच्या गायीसाठी येथेच गीर जातीचे बीज उपलब्ध करुन देत आहे. भविष्यात इतरही जातीच्या गायीचे बिज मागणी नुसार उपलब्ध करु. 
- डॉ. अमोल जाधव, पशुसंवर्धन अधिकारी, बोधेगाव.  
 

संपादन - अशोक निंबाळकर