
राहुरी : वरवंडी (ता. राहुरी) शिवारात जेट फायटर विमानातून पडलेला जिवंत बॉम्ब तब्बल एक महिन्यापासून सात फूट खड्ड्यात तसाच पडून आहे. साडेतीन ते चार फूट लांबीचा सुमारे दीडशे किलो वजनाचा रांजणाच्या आकाराचा भला मोठा ‘बॉम्ब’ पीन निघाली नसल्याने फुटला नाही; अन्यथा मोठी जीवित व वित्तहानी झाली असती. भारतीय सैन्य दलाच्या लालफितीच्या कारभारात ‘बॉम्ब’ अडकला आहे. तो लवकर हलविण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.