बाल दिनानिमित्त नूतन माध्यमिक विद्यालयाला पुस्तकांची भेट

आनंद गायकवाड
Wednesday, 18 November 2020

पुस्तकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक माहिती मिळून, आपल्या आरोग्याविषयी त्यांची जाणीव जागृती होण्यासाठी योग संस्कृती हेल्थ रिसर्च सोशल फाउंडेशनच्या वतीने योगतज्ज्ञ संतोष देशमुख यांनी योगासने, प्राणायाम, आहार, व्यायाम, प्रार्थना इत्यादी विषयांचे तीन हजार रुपये किमतीची 30 पुस्तके नूतन माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्रीधर घोडेकर, अध्यक्ष अनिल गोडसे यांच्याकडे सुपूर्त केली.

संगमनेर (अहमदनगर) : पुस्तकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक माहिती मिळून, आपल्या आरोग्याविषयी त्यांची जाणीव जागृती होण्यासाठी योग संस्कृती हेल्थ रिसर्च सोशल फाउंडेशनच्या वतीने योगतज्ज्ञ संतोष देशमुख यांनी योगासने, प्राणायाम, आहार, व्यायाम, प्रार्थना इत्यादी विषयांचे तीन हजार रुपये किमतीची 30 पुस्तके नूतन माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्रीधर घोडेकर, अध्यक्ष अनिल गोडसे यांच्याकडे सुपूर्त केली.

सोशल मीडियाच्या जमान्यात विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक माहिती मिळावी. योगासने, प्राणायाम सहज करता यावेत तसेच प्रार्थना, गुरु या विषयाची माहिती समजावी यासाठी पुस्तकांची भेट देण्यात आली आहे. यावेळी स्कूल कमिटीचे उपाध्यक्ष मनोज हासे, प्रा. संदेश देशमुख, पर्यवेक्षक बाळासाहेब खताळ, जिजाबा हासे, सलीम पठाण, पंढरीनाथ पथवे, ग्रंथपाल नानासाहेब गाडेकर, मच्छिंद्र देशमुख, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र देशमुख आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Book gift to the new secondary school on the occasion of Children Day