लोकसहभाग मिळणे फार गरजेचे

A booklet titled Water Conservation Water Management and Panand Road has been published at Jamkhed by MLA Rohit Pawar under Parivartan Parva Integrated Village Development Project 2.jpg
A booklet titled Water Conservation Water Management and Panand Road has been published at Jamkhed by MLA Rohit Pawar under Parivartan Parva Integrated Village Development Project 2.jpg

जामखेड (अहमदनगर) : वर्षानुवर्षे मागणी होऊनही शासनाच्या कोणत्याच निधीतून जे रस्ते करता येत नाहीत ते गाव पातळीवरील विविध प्रकारचे 'पानंद रस्ते व शेतरस्ते ' करण्यासाठी आपण विविध संस्थांच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे. मात्र या कामी लोकसहभाग मिळणे फार गरजेचे आहे. या माध्यमातून निश्चितपणे तालुक्यातील मोठ्या प्रमाणात रस्ते करता येतील. आपण स्वतः याकरिता कर्जतला २५ आणि जामखेडला ही २५ जेसीबी मशीन देतो आहोत, त्या मशीनने केलेल्या कामाची बीलं काढली जाणार नाहीत, ते मोफत असतील असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले.

मंगळवारी जामखेड येथे जिल्हा प्रशासन भारतीय जैन संघटना, नाम फाउंडेशन व कर्जत-जामखेड यांच्या पुढाकाराने एकात्मिक विकास संस्था प्रणित परिवर्तन पर्व एकात्मिक ग्रामीण विकास प्रकल्प अंतर्गत जलसंधारण जलव्यवस्थापन पानंद रस्ता गाव पातळीवरील शेत रस्ते या योजनेचा शुभारंभ आमदार रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी उपजिल्हाधिकारी हिचवे, उपविभागीय पोलिस अधिकारी आण्णासाहेब पाटील, तहसीलदार विशाल नाईकवाडे, गटविकास अधिकारी पी.पी कोकणी, तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे आदींसह तालुक्यातील सर्व विभाग प्रमुख कर्मचारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले, पानंद रस्ते व शेतरस्ते ही योजना अधिकारी-कर्मचारी आणि कार्यकर्ते यांच्या एकत्रित प्रयत्नातून राबविण्यात येणार आहे. त्याच बरोबर जलसंधारणची कामेही करता येतील. यासाठी तालुका समन्वयक हे आपल्या तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना संपर्क करून उपक्रमाची माहिती देतील. याकरिता तालुकास्तरावर एक समिती असेल. तालुका समन्वयक गावचे तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक यांच्याशी समन्वय ठेवून येणाऱ्या मागणीनुसार त्यात या गावांना भेटी देऊन कामांच्या ठिकाणाची माहिती घेतील आणि जर काम करण्या योग्य परिस्थिती असेल. 

लोकसहभागातून एक मताने नागरिक व ग्रामस्थ समिती सदर काम पूर्ण करण्यात सहभागी होत असेल तर सर्वेक्षणाअंती तसा अहवाल तालुकास्तरीय समितीकडे सादर करतील. सर्व भागधारकांना याबाबत माहिती देऊन त्यास मान्यता देण्यात येईल. सदर मान्यता झाल्यानंतर व ग्रामपंचायतीशी म्हशींच्या बाबत करार करण्यात येईल. हा करार अस्तित्वात आल्यानंतर सदर गावात काम करण्यासाठी मशीन पाठवले जाईल. हे काम सुरू असताना त्या कामाची देखरेख आणि मशीनची जुजबी देखभाल करण्यासाठी गावातील एक ग्राम समन्वयक म्हणून ग्राम समिती काढून नेमली जाईल. मशिनद्वारे हे काम पूर्ण झाल्यावर त्या कामाचा पूर्णत्वाचा दाखला घेऊन सदर मशीन परत घेण्यात येईल. लोकसहभागातून आणि लोकांच्या मागणीनुसार होणाऱ्या सर्व कामावर लोकांचे तसेच समितीचे नियंत्रण असेल.

या उपक्रमात ग्रामपंचायती, प्रगतशील शेतकरी, शेतकरी मंडळ, गाव पातळीवरील करायची सर्व प्रकारची कामे प्रस्तावित करता येतील.

संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com