Both have been arrested in a diesel theft case in Karjat
Both have been arrested in a diesel theft case in Karjat

कर्जत येथील डिझेल चोरी प्रकरणी दोघांना अटक

Published on

कर्जत (अहमदनगर) : येथे डिझेल चोरी प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. अक्षय बाळु शिंदे, दत्ता बापु भोसले दोघे (रा. भावडी, ता. श्रीगोंदा) असे आरोपींची नावे असून ते कर्जत तालुक्यात डिझेल चोरी करीत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली आहे.

या बाबत वृत्त असे की, शेतकऱ्यांच्या पाण्यातील मोटार चोरी करणारे आरोपीचा शोध, गुप्त माहितदार व तांत्रिक तपासणी द्वारे सुरु असताना माहितीसमोर आली की अक्षय बाळु शिंदे, दत्ता बापु भोसले दोघे (रा. भावडी, ता. श्रीगोंदा) हे कर्जत तालुक्यातून काही ठिकाणाहून डिझेल चोरी करत आहेत. सविस्तर माहिती घेतली असता असे प्रकार झाले असल्याचे निष्पन्न झाले.

काही दिवसांपूर्वीसुद्धा असा प्रयत्न त्यांनी केला असल्याबाबत माहिती मिळाली. त्यावरून त्यांच्या विरुद्ध डिझेल चोरण्याचा प्रयत्न केल्याबाबत संदेश रेड्डी (रा. कर्जत) यांनी फिर्याद दिल्याने त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी आण्णासाहेब जाधव, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश माने, अंमलदार सुनील मळशिकरे, भाऊसाहेब यमगर, शाम जाधव, गोवर्धन कदम, सुनील खैरे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com